शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा संपर्क तुटला; पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडल्याने पुष्पावती नदीला पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:53 IST

पिंपळगाव जोगा, सांगणारे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. अचानक पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ओतूर : पिंपळगाव जोगा धरणातून (दि. २८) रात्री तब्बल २७८० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं पुष्पावती नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे परिसरातील लहानमोठे पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे.यात सर्वाधिक परिणाम पिंपळगाव जोगा येथील पुलावर झाला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने पिंपळगाव जोगा, सांगणारे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. अचानक पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.परिसरातील अंदाजे ८० ते १०० मोटारी पाण्याखाली गेल्या, तसेच ४ ते ५ जनावरे दगावली. शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले असून पिकअप गाडी व मंदिरही पाण्यात गेले आहे. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.स्थानिकांच्या मते, पूर्वी ५०० ते १००० क्युसेक पाणी सोडले जात होते. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. पाणी शिरलेल्या प्रत्येक मोटरच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ पंकज हांडे, नवनाथ सुकाळे व राजू घाडगे यांनी सांगितले.दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले की, धरण ९३ टक्के भरले असल्याने व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpalgaon Joga Dam Release Floods Pushpavati River, Villages Disconnected

Web Summary : Water released from Pimpalgaon Joga Dam caused severe flooding in the Pushpavati River, disconnecting villages. Farmers suffered significant losses; motors, livestock, and crops were damaged. Authorities cite heavy rains and dam capacity as reasons for the release, urging caution.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस