प्रस्तावित रिंगरोडला शिवगंगा खोऱ्यातील ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:41+5:302021-02-05T05:08:41+5:30
शिवगंगा खोऱ्यातील परिसरात सध्या प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या चर्चेला उधाण आले आहे. भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कुसगाव, शिवरे, तर ...

प्रस्तावित रिंगरोडला शिवगंगा खोऱ्यातील ग्रामस्थांचा विरोध
शिवगंगा खोऱ्यातील परिसरात सध्या प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या चर्चेला उधाण आले आहे. भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कुसगाव, शिवरे, तर हवेली तालुक्यातील रहाटवडे, घेरा सिंहगड या गावांत प्रामुख्याने बागायती जमिनी आहेत. त्यामुळे ज्या जमिनीवर अवघ्या कुटुंबाचे आयुष्य अवलंबून आहे. त्या जमिनी व घरे प्रस्थापित रिंगरोडमध्ये जाणार असल्याने परिसरातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात रिंगरोडविरोधात परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. संबंधित नागरिकांनी यासंबंधातील निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना दिले असल्याची माहिती दिली.
चौकट
रहाटवडे (ता. हवेली) या गावातील युवक नितीन चोरघे म्हणाला की, माझी एकूण दोन एकर शेती आहे. मी लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. मी, माझी आई व बहीण मिळून सध्या दोन एकरमधील दीड एकर जमिनीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन उदरनिर्वाह करीत आहे. तर उर्वरित अर्धा एकर ही डोंगराळ भागात आहे. जी बागायत जमीन आहे तीच या रिंगरोडमध्ये जाऊन माझे स्वतःचे घरसुद्धा जाणार? असल्याने आमचा उदरनिर्वाह कसा करणार, आम्ही कोठे जाणार? असा आर्त प्रश्न उपस्थित केला.
*
फोटो रिंगरोड विरोधातील निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना देताना शिवगंगा खोऱ्यातील नागरिक