शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांविरोधात ग्रामस्थ संतप्त

By admin | Updated: June 26, 2015 04:17 IST

सातत्याने होणारा वाळू उपसा, तक्रारी करुनही महसुल विभागाने केलेले दुर्लक्ष यामुळे शेवटी वाळू माफियांना रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन जुन्नर

बेल्हा : सातत्याने होणारा वाळू उपसा, तक्रारी करुनही महसुल विभागाने केलेले दुर्लक्ष यामुळे शेवटी वाळू माफियांना रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील ओढ्यावरील अवैद्य वाळू उपसा थांबविला़ यावेळी झालेल्या बाचाबाचीत ग्रामस्थांनी वाळू उपसा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक करुन त्यांना पळवून लावले़ तसेच त्यांच्या दोन दुचाकीही पेटवून दिल्या. त्यानंतर महसुल विभाग खडबडुन जागा झाला व त्यांनी लिलावाच्या व्यतिरिक्त सरकारी ओढ्यातून सुमारे ५०० ब्रास वाळू संबंधित ठेकेदार व त्यांच्या सहका-यांनी चोरुन नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.या बाबत मिळालेल्या माहिती अशी, साकोरी येथील पुलाच्या पलीकडील कुकडी नदी पात्रातील वाळुचे लिलाव झालेले आहेत. मात्र या बाजुलाच असणाऱ्या या सरकारी ओढ्यातूनही अवैद्यरित्या वाळु उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महसुल विभागाकडे केल्या. मात्र महसुल विभागाने याची दखल घेतल नाही़ त्यामुळे आज ग्रामस्थांचा उद्रेक झाला. ग्रामस्थ एकत्र आले व ते वाळू उपसा सुरु असलेल्या ओढ्यावर गेले़ त्यांनी वाळू चोरी रोखली.यामुळे ग्रामस्थ व अनधिकृत वाळु उपसा करणाऱ्यांमध्ये प्रथम शाब्दीक चकमक सुरु झाली. या चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले़ ग्रामस्थांनी या वाळु माफियांना पळवून लावले़ त्यांच्या वाळु उपसा करणाऱ्या तसेच वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या मध्ये काही दुचाकी व एक कार जाळण्याचा प्रयत्न झाला.साकोरी येथील या प्रकाराची माहिती महसुल तसेच आळेफाटा पोलिसांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटना स्थळी दाखल झाले. पोलीस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी जमावाला शांत करत ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली. यामध्ये ग्रामस्थांनी या ओढ्यातुन अवैद्य रित्या होणा-या वाळु उपसा बाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)