शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

विजय शिवतारेंची रुग्णालयात भेट; मंत्री दीपक केसरकरांसोबत 'बारामती पे चर्चा'?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:21 PM

मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते.

मुंबई/पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दोन दिवस सबुरीचे धोरण बाळगणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, ते दौड मतदारसंघातील दौऱ्यावर जात असतानाच त्यांना पुण्यातून बोलवण आल्यामुळे ते पुण्याकडे परत फिरले. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारेंची भेट घेऊन चर्चा केली. 

मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. याबाबत स्पष्टीकरण देताना, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबणं ही बातमी नाही, माझी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा झाली आहे. त्यानुसार, मी दोन दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे, काय असेल ते पुढे पाहता येईल, असेही शिवतारेंनी म्हटले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर व खासदार राहुल शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन शिवतारेंची भेट घेतली. या भेटीत बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून शिवतारेंची समजूत घालण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवतारेंची भूमिका काय असेल हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. दरम्यान, शिवातरेंना किडनीचा त्रास असल्याने त्यांना डायलिसीस करावं, लागतं. ते डायलिसीस करण्यासाठी रुबी हॉस्पीटलमध्ये गेले होते. त्यावेळी, रुग्णालयात जाऊन मंत्री केसरकर यांनी बंद दाराआड त्यांच्यासमवेत चर्चा केली. 

दरम्यान, विजय शिवतारे हे दौंडच्या दौऱ्यावरती होते परंतु दौरा मध्येच सोडून विजय शिवतारे पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन एक मंत्री आले असल्याची बातमी आली त्यामुळे विजय शिवतारे यांना संध्याकाळी हा दौरा अर्धवट सोडून पुण्याला जावं लागलं. रात्री उशिरा केसरकर आणि शेवाळे यांनी विजय शिवतारे यांचे रुग्णालयात भेट घेतली.  

 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेEknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणेDeepak Kesarkarदीपक केसरकर Baramatiबारामतीlok sabhaलोकसभा