शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 8:32 PM

आर्थिक गैरशिस्तीच्या कारणावरून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या शिफारसीनुसार सहकार विभागाने ७ मे २०११ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.

ठळक मुद्देबँकेच्या अंतर्गत राज्यात ३१ जिल्हा बँका, २१ हजार प्राथमिक कृषी संस्था, ५०७ नागरी सहकारी बँका, २४ हजार पतसंस्था राज्य सहकारी बँकेची उलाढाल २७ हजार ८७० कोटी रुपयेसाखरेचे भाव कोसळल्यामुळे कारखान्यांच्या कर्जासाठी अपुरा दुरावा निर्माण

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्याचे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. प्रशासकीय मंडळाचे सदस्य म्हणून संजय भेंडे आणि अविनाश महागावकर काम पाहतील. देशातील सर्वांत मोठी राज्य बँक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ओळखले जाते. आर्थिक गैरशिस्तीच्या कारणावरून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या शिफारसीनुसार सहकार विभागाने ७ मे २०११ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर डॉ. एल. एल. सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांचे प्रशासकीय मंडळ बँकेवर नेमण्यात आले. त्यात अनास्कर, भेंडे, महागांवकर यांच्यासह अशोक मगदुम आणि कुमार तांबे यांचाही समावेश होता. सुखदेवे यांनी १९ एप्रिल २०१८ रोजी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यापुर्वी १ आणि २ डिसेंबर २०१७ रोजी मगदुम आणि तांबे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन प्रशासकीय मंडळाकडे कामाची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेची उलाढाल २७ हजार ८७० कोटी रुपये असून, खेळते भांडवल ३० हजार कोटी रुपये आहे. गतवर्षी बँकेस २४५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यातून सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटपही करण्यात आले. या बँकेस १०७ वर्षे पूर्ण झाली असून, राज्यातील सहकारी पत पुरवठ्याची शिखर संस्था म्हणून ती काम करते. बँकेच्या अंतर्गत राज्यात ३१ जिल्हा बँका, २१ हजार प्राथमिक कृषी संस्था, ५०७ नागरी सहकारी बँका, २४ हजार पतसंस्था आणि २५ हजार नोकरदारांच्या पतसंस्था कार्यरत आहेत. ---------------साखरेचे भाव कोसळल्यामुळे कारखान्यांच्या कर्जासाठी अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर अनुत्पादक खात्यांची तरतूद करण्याची जबाबदारी बँकेच्या प्रशासकीय मंडळावर आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रशासकीय मंडळ प्रयत्न करेल. - विद्याधर अनास्कर

टॅग्स :Puneपुणेbankबँक