Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दाखवले काळे कापड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:21 PM2022-03-06T12:21:44+5:302022-03-06T12:22:30+5:30

पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करत पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या पंतप्रधान मोदींचे बिल्डिंगच्या टेरेसवर येऊन काळे झेंडे दाखवत निषेध केला

Video: Women of NCP show black cloth while traveling in Prime Minister Narendra Modi's Metro | Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दाखवले काळे कापड

Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दाखवले काळे कापड

Next

पुणे : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, मेट्रो प्रवास, एमआयटी सभा असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी गरवारे ते आनंदनगर प्रवास करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी काळे कापड दाखवले आहे. 

पुणेमेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करत पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या पंतप्रधान मोदींचे बिल्डिंगच्या टेरेसवर येऊन काळे झेंडे दाखवत निषेध केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, पूजा बुट्टे पाटील सोनाली गाडे, सानिया झुंजारराव, जान्हवी शेट्टी या युवती पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.

राष्ट्रवादीकडून ससून जवळही आंदोलन 

''अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील.एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत असून ,ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत. निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून ससून जवळील डॉ बाबासेहब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ राष्ट्रवादीच्या वतीने काळे कपडे घालून आंदोलन कऱण्यात आले.'' 

Web Title: Video: Women of NCP show black cloth while traveling in Prime Minister Narendra Modi's Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.