शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Video: येरवड्यात पुन्हा जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:31 IST

परिसराचा पाणीपुरवठा केला खंडित; दुरुस्तीच्या कामानंतर उद्या मिळणार पाणी 

येरवडा: येरवड्यातील पर्णकुटी चौका जवळ बंडगार्डन पुलावरील जुनी व जीर्ण झालेली जलवाहिनी शुक्रवारी दुपारी फुटली. अचानक फुटलेल्या या  जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले.

येरवडा परिसरात विविध विकास कामे सुरू असल्याने जलवाहिनी फुटण्याच्या घटना कायम घडत असतात.या घटनांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जाते. आजही पर्णकुटी परिसरातील जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. नऊशे व्यासाची जुनी व जीर्ण झालेली हि जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण येरवडा परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

तसेच भामा आसखेड प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे देखील पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत करण्यात येणार असून उद्या शनिवारी नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. अचानक जलवाहिनी फुटल्यामुळे येरवडा परिसरातील नागरिकांचा पाण्याचा खोळंबा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी फुटली होती जलवाहिनी....

येरवडा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हरीगंगा सोसायटी समोर फुटलेल्या जलवाहिनीतून असेच हजारो लिटर पाणी वाया गेले होते.  संध्याकाळी साडेपाच वाजता ही जलवाहिनी फुटली रात्री बारा वाजेपर्यंत या फुटलेला जलवाहिनीतून पाणी वाहत होते. मात्र, पुण्यासारख्या शहरात अशा आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अजूनही यंत्रणा उपलब्ध नाही. दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये उधळणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांसह जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील याबाबत गंभीर नाहीत. 

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताना पाणीपुरवठा विभाग किंवा खाजगी कंपनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असतात. दुरुस्तीचे काम करत असताना जलवाहिनी फुटून वाया गेलेले हजारो लिटर पाणी याला जबाबदार कोण?  असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नुकसान करणाऱ्या खासगी कंपन्या व त्यांचे ठेकेदार यांच्यावर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका