शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

VIDEO: पुण्यात राज ठाकरेंनी चिमुकल्याचं केलं नामकरण! जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:04 IST

यापुर्वीही पुण्यातील एका दौऱ्यात एका लहान मुलानं राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड केलेली बघताना राज ठाकरेंनी स्वतः त्या मुलाला आटोग्राफ दिला होता

पुणे: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांना पुणे दौऱ्यावर असताना एक वेगळाच अनुभव आला आहे. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परभणीचे जिल्ह्यातील एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली. याला राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या बाळाचे नामकरन केले. निशांत आणि विशाखा कमळू हे दाम्पत्याच्या मुलाचे नाव राज ठाकरे यांनी यश असे ठेवले. राज ठाकरे यांच्याकडून चार महिन्यांच्या चिमुरड्याचं नाव ठेवण्यासाठी हे दाम्पत्य थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले होते.

केसरीवाड्यातील बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज ठाकरे यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले होते. पण नंतर मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिलं. निशांत हे गेली १४ वर्षे राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते तर आहेतच, शिवाय मनसेचे पदाधिकारीही आहेत. 

यापुर्वीही पुण्यातील एका दौऱ्यात एका लहान मुलानं राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड केलेली बघताना राज ठाकरेंनी स्वतः त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. विशेष म्हणजे सभोवताली गर्दी असल्याने वही ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेते वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवत त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. त्यामुळे राज ठाकरे एका नेत्याच्या पलीकडे चिमुकल्यांचेही लाडके आणि आपल्या चिमुकल्या चाहत्यांना न दुखवणारे असे नेते आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळतं. खासकरुन लहान मुलं राज ठाकरेंना फार आवडतात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे