शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मोक्का कारवाईतून जामिनावर मुक्तता; माजी सरपंचाला ग्रामस्थांचा चक्क 'दुग्धाभिषेक'; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:51 IST

माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

माळेगाव : माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर त्यांना दुधाने दुग्धभिषेक घालत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर 'व्हायरल' होत आहे. 

माळेगाव येथे ३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक देखील केली होती. तसेच बारामती पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास करून मोक्का अंतर्गंत कारवाई केल्याची ही पहिलीच कारवाई होती. मात्र, काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी याप्रकरणी माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक केली होती. 

राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांच्या अटकेच्या विरोधात माळेगाव येथे जनता रस्त्यावर उतरली होती.यावेळी तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगांव येथे पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. 

मात्र, पोलिसांनी मोक्का न्यायालयात सदर गोळीबारच्या गुन्ह्यात जयदीप तावरे यांचा हात नसल्याप्रकरणी युक्तिवाद कोर्टात केल्याने तावरे यांची सध्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना दुधाने अंघोळ घालत आनंद व्यक्त केला.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसCourtन्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस