शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: चंद्रकांत पाटील येताच वाजवलं 'राष्ट्रवादी पुन्हा...' गाणं; भलतंच धाडस डीजेला पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:12 IST

पोलिसांनी हे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला

पुणे : पुणे शहरातील रास्ता पेठेत दुधभट्टी भागात दरवर्षी सगर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी रेडे आणले जातात. व त्यांना मान दिला जातो. यंदाही कोरोनाच्या दोन वर्षांनंतर दुधभट्टी भागात सगरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात असल्याने त्यांनी याठिकाणी भेट दिली. तेव्हा पाटील येताच मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावण्यात आली होती. एवढच करून डीजेवाला थांबला नाही. तर त्याने चक्क पाटील यांच्या उपस्थितीत ''राष्ट्रवादी पुन्हा....'' हे गाणं वाजवण्याच धाडस केलं आहे. याप्रकरणी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले आहे. 

दिवाळीनिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मंत्री पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापमाणेच पुण्याचे पालकमंत्री दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेटी देऊन शुभेच्छा देत होते. त्याच वेळी रास्ता पेठेत सगर कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पाटील कार्यक्रमस्थळी दाखल होताच डीजेने भलतंच धाडस केलं आहे. त्याने त्यांच्यासमोर "राष्ट्रवादी पुन्हा..." ही गाणं मोठ्या आवाजात स्पीकरवर लावले. हे धाडस डीजेला चांगलाच महागात पडलं असून त्याला पोलिसांनी त्याच क्षणी ताब्यात घेतले आहे. पाटील कार्यक्रमस्थळी येताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावलं. यानंतर उपस्थितांमध्ये थोडासा गोंधळ उडाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी हे गाणं वाजवणाऱ्या डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी, त्याने साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं कारण दिलं आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSocialसामाजिकDiwaliदिवाळी 2022PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा