शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसारखा गणवेश परिधान करून व्हिडिओ कॉलचा वापर; कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:43 IST

ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणे, तसेच मनी लाँड्रिंगसाठी झाल्याची बतावणी चोरट्यांनी केली.

पुणे : दहशतवादी हल्ला, तसेच मनी लाँड्रिंगसाठी बँक खात्याचा वापर झाल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका ज्येष्ठाची २० लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला. चोरट्याने ज्येष्ठाशी संपर्क साधताना व्हिडिओ काॅलचा वापर केला होता. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणे, तसेच मनी लाँड्रिंगसाठी झाल्याची बतावणी चोरट्यांनी केली. या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखवली. चोरट्यांनी त्यांना तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांच्या बँक खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी २० लाख ६५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ननावरे करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची २७ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खडकीतील रेंजहिल्स परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी पैसे जमा केले. त्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंग कदम पुढील तपास करत आहेत.

तरुणीची १२ लाखांची फसवणूक...

वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणीची १२ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल नंबरवर मेसेज पाठवला होता. वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखवले. तरुणीला सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर तरुणीला चोरट्यांनी ऑनलाइन कामात पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर तरुणीला परतावा देण्यात आला नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे करत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Cybercriminals Impersonate Police, Dupe Senior Citizen of ₹20 Lakhs

Web Summary : Cyber fraud in Pune: A senior citizen lost ₹20 lakhs to scammers posing as police via video call. They falsely claimed his bank account was linked to terrorism and money laundering, extorting funds. Other scams involving investment and work-from-home schemes also reported.
टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीSenior Citizenज्येष्ठ नागरिकCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरल