शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपील’मुळे तरुणींचा बळी

By admin | Updated: May 28, 2014 02:02 IST

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे

पुणे : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येणार्‍या आय पीलच्या रंजक जाहिरातींना भुलून महाविद्यालयीन तरुणी या गोळ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येऊ लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘मासिक पाळी आणि स्वच्छता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सूथ हेल्थ केअरच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवदा तेलंग, ‘युनिसेफ’चे अधिकारी युसूफ कबीर, इंग्लंडमधील माजी पोलीस अधिकारी मोना सेलडोन, प्राध्यापक अपर्णा दीक्षित, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शाह, मीना शाह या तज्ज्ञांनी भाग घेतला. डॉ. तेलंग म्हणाल्या, ‘कोणतीही सुरक्षितता न बाळगता शरीरसंबंध आल्यानंतर गर्भधारणा नको असल्यास १२ तासांच्या आत आय पील गोळी घेणे आवश्यक असते. ही गोळी एकदाच घ्यायची असते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत पाळी येणे अपेक्षित असते. मात्र, पाळी आली नाही की पुन्हा गोळी घेतली जाते. जे पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, जाहिरातींमधील चुकीच्या माहितीमुळे या गोळ्या चॉकलेटसारख्या खाल्ल्या जात आहेत. माझ्याकडे दररोज महाविद्यालयीन ४ ते ५ तरुणी आय पील ३ ते ४ वेळा घेतल्यानंतरही पाळी न आल्याने येतात. या गोळ्या सारख्या घेतल्या तर पाळीचे चक्र बिघडून संबंधित महिलेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कबीर यांनी ‘महिला आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता’ या विषयात देशातील व महाराष्टÑातील सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महाराष्टÑ आणि देशात मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत महिलांमध्ये खूप वाईट स्थिती असून अनेक गैरसमजुती आहेत. देशात ११ ते १९ वयोगटांतील ११ कोटी ५० लाख मुली आहेत, त्यांपैकी ६ ते ८ कोटी मुली शाळांमध्ये जातात. त्यांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत. लातूर, चंद्रपूर आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये ९० टक्के मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, हे माहितीच नसल्याचे ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. ६० ते ७० टक्के मुली या काळात शाळेतच जात नाहीत. ५० टक्के मुलींना पाळी हा एक आजार असल्याचे वाटते. आजही देशात ८८ टक्क्यांपर्यंत महिला सॅनिटरी नॅपकीनऐवजी कापडाचाच वापर करतात.’ सेलडोन यांनी ‘महिलांवरील अत्याचार आणि कायदे’ या विषयावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने जग हादरले होते, यामुळे केंद्र शासनाने तातडीने पावले उचलत यासंबंधीचे कायदे कडक केले. मात्र आजही बलात्काराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण भारतात खूप आहे मात्र शिक्षा मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.’ डॉ. विनोद शाह, मीना शाह, दीक्षित यांनीही मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)