सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 18:14 IST2023-06-06T18:14:13+5:302023-06-06T18:14:46+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळाले...

Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Appointment of Suresh Vamangir Gosavi | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. तर डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

राज्याच्या राज्यपालांनी यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू म्हणून डॉ. संजय घनश्याम भावे यांची नियुक्तीही जाहीर केली आहे. डॉ संजय भावे हे डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

Web Title: Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Appointment of Suresh Vamangir Gosavi