पुणे : शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, असे सहजपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर येणारे बडबडगीत विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक शैक्षणिक साहित्यातून प्राथमिक शिक्षणाला सुरुवात करणारी पाटी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्याकडे पालकांचा कल अधिक दिसून येतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखन (पेन्सिल) ही कालबाह्य संकल्पना वाटते. पाटीचा वापर कमी झाल्यामुळे बाजारात विविध आकर्षक रंगात मण्याच्या माळात अडकलेली पाटी दिसेनाशी होत चालली आहे.
पाटी-पेन्सिल नामशेष होण्याच्या मार्गावर : इंग्रजी माध्यम शिक्षण पध्दती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:51 IST
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही.
पाटी-पेन्सिल नामशेष होण्याच्या मार्गावर : इंग्रजी माध्यम शिक्षण पध्दती
ठळक मुद्देपाटीकडून टॅबकडे वेगाने प्रवास करणारी शिक्षण प्रणाली