शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 07:00 IST

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे

ठळक मुद्देआरटीओकडे होत असलेल्या वाहन नोंदणीमध्ये मागील दोन वर्ष सातत्याने घटदुचाकी विक्रीला सर्वाधिक फटका

- राजानंद मोरेपुणे : देशभर वाहन उद्योगात असलेली मंदी पुण्यातही जाणवत आहेत. पुण्यातील वाहन विक्री मागील वर्षाच्या नीचांकावर पोहचली आहे. प्रामुख्याने दुचाकी व कारच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून येते. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचा विचार केल्यास २०१७ मध्ये अनुक्रमे ६९ हजार १८ हजार ६०० गाड्यांची विक्री झाली होती. ही विक्री २०१९ मध्ये अनुक्रमे १६ हजार व चार हजाराने कमी झाली आहे. मागील वषार्पासूनच वाहन विक्री मंदावल्याचे आकडेवारीवरून दिसते. वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची ठाम भुमिका, घटती मागणी अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे. पुण्यातील वाहन विक्रीवरही मंदीचे सावट घोंघावत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)कडे होत असलेल्या वाहन नोंदणीमध्ये मागील दोन वर्ष सातत्याने घट होत आहे. आरटीओकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात (एमएच १२) आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे २ लाख ९१ हजार तर २०१८-१९ मध्ये २ लाख ६१ हजार वाहनांची नोंदणी झाली. याचाअर्थ मागील वर्षी सुमारे ३० हजारांनी वाहन विक्रीत घट झाली. ही घट आर्थिक वर्ष २०१९-२० मध्येही कायम राहणार असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत ७६ हजार ७५१ वाहनविक्री झाली आहे.मागील तीन वर्षांचा विचार केल्यास मे महिन्यात २०१७ मध्ये २७ हजार ६०० वाहनांची विक्री झाली होती. २०१९ पर्यंत त्यामध्ये ७ हजारांनी घट झाली. हीच स्थिती जून महिन्यातही कायम राहिली आहे. जुनमध्ये २०१७ मध्ये २५ हजार ६२२ वाहने नोंदविली गेली होती. हा आकडा २०१९ मध्ये १६ हजारापर्यंत खाली आला आहे. जुलै महिन्यात २०१८ मध्ये २३ हजार तर २०१९ मध्ये १८ हजार वाहनांची नोंद झाली. सलग तिसºया वर्षी वाहन विक्रीमध्ये घट झाल्याचे यावरून स्पष्ट होते.  --------पुण्यातील तीन वर्षांची वाहन विक्री -वर्ष व महिना    २०१७        २०१८        २०१९एप्रिल        २१,९०९        २२,६३९        २१,७६५मे        २७,६००        २२,५१२        २०,५७६जून        २५,६२२        २०,९४२        १६,०३०जुलै        १९,२१६        २३,३२६        १८,३८०-----------------------------------वाहन विक्री

वाहन प्रकारनिहाय विक्रीत झालेली घटएप्रिल ते जुलै        दुचाकी        कार        २०१७            ६९,१४५        १८,६०४        २०१८            ५९,५३९        १५,२९४२०१९            ५३,५१८        १४,७४५-----------एप्रिल १७ ते मार्च १८ - २,९१,११७एप्रिल १८ ते मार्च १९ - २,६१,४१०एप्रिल १९ ते जुलै १९ - ७६,७५१-----------दुचाकी विक्रीला सर्वाधिक फटकावाहन विक्रीमध्ये सर्वाधिक फटका दुचाकी उद्योगाला बसल्याचे आकडेवारीवरून दिसते. सलग तीन वर्षात मोठी घट झाल्याचे दिसते. पुण्यात (एमएच १२) एप्रिल ते जुलै या महिन्यात २०१७ मध्ये सुमारे ६९ हजार दुचाकींना ग्राहकांनी पसंती दिली होती. तर कारची विक्री १८ हजार ६०० एवढी होती. २०१८ मध्ये ही विक्री अनुक्रमे ५९ हजार ५०० व १५ हजार ३०० पर्यंत खाली आली. २०१९ मध्येही ही घट कायम राहिली असून विक्रीचा आकडा अनुक्रमे ५३ हजार ५०० व १४ हजार ७०० पर्यंत मयार्दीत राहिली आहे. पुण्यात २०१८-१९ मध्ये विक्री झालेल्या सुमारे २ लाख ६१ हजार वाहनांपैकी १ लाख ७६ हजार दुचाकींची संख्या आहे. त्यामुळे दुचाकीची विक्री सर्वाधिक रोडावल्याचे ठळकपणे दिसून येते.

 

टॅग्स :PuneपुणेAutomobileवाहनtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरGovernmentसरकार