Pune: मुंढव्यात वाहनांना आग, वाहने पेटविल्याचा संशय; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

By विवेक भुसे | Published: April 1, 2024 03:04 PM2024-04-01T15:04:51+5:302024-04-01T15:05:24+5:30

मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पो आणि मोटारीने पेट घेतला....

Vehicle fire in Mundhwa; Suspected of setting fire to vehicles. The fire was brought under control by the fire brigade | Pune: मुंढव्यात वाहनांना आग, वाहने पेटविल्याचा संशय; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Pune: मुंढव्यात वाहनांना आग, वाहने पेटविल्याचा संशय; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुणे : रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटार, तसेच टेम्पोला आग लागल्याची घटना मुंढवा भागात मध्यरात्री घडली. आगीत दोन वाहने पूर्णपणे जळाली. जुना मुंढवा रस्ता परिसरातील बोराटे वस्ती परिसरात एका इमारतीसमोर टेम्पो आणि मोटार लावण्यात आली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पो आणि मोटारीने पेट घेतला.

मोटार, टेम्पोने पेट घेतल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्यााचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांनी दिली.

आगीमागचे कारण समजू शकले नाही. एकंद परस्थिती पाहिल्यावर टेम्पो आणि मोटार हे एकमेकांपासून काही अंतरावर होते. तरी त्यांना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून चाैकशी करण्यात येत आहे.

Web Title: Vehicle fire in Mundhwa; Suspected of setting fire to vehicles. The fire was brought under control by the fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.