शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

शिवचरित्राच्या निर्मितीसाठी विकला भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:41 AM

लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळे इतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो.

पुणे : लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळेइतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो. अखंड साधना, भ्रमंती यातून अनेक वर्षांच्या कष्टातून शिवचरित्र जन्माला आले. मात्र, पुढे त्याची छपाई, विक्रीसाठी पैसा उभाराहावा याकरिता पुण्याहून मुंबईला भायखळ्यातील मार्केटमध्ये कोंथिबीर विकली. त्यातून उभा राहिलो. परंतु, शिवचरित्रनिर्मितीची जिद्द सोडली नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र निर्मितीबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा देत होते.राजहंस प्रकाशन व्यवसायाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. या विस्ताराच्या निमित्ताने राजहंस प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यावतीने आयोजितकरण्यात आलेल्या ‘विस्तार विशेषांकाचे’ प्रकाशनराजहंसचे संस्थापक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्तेझाले.याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ‘राजहंसी दिवस’ च्या गप्पांमधून बाबासाहेबांना बोलते के. ले. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिरात रसिकश्रोत्यांच्या प्रचंड गर्दीत पार पडलेल्या समारंभाला विनायकराव पाटील, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर, रसिका राठीवडेकर उपस्थित होते.वयाची ९६ वर्षे पूर्णकरणाऱ्या बाबासाहेबांना संकटांचा सामना करताना खचल्यासारखे झाले नाही का? यावर शिवाजीमहाराजांमुळे खचलो नाही. असे उत्तर बाबासाहेबांनी दिल्यावर रसिकांनी टाळ्यांचा क डक डाट करून त्यांच्या त्या उत्तराला मन:पूर्वक दाद दिली. याशिवाय आईचे प्रेम, शेवटपर्यंत वडिलांबरोबर जपलेले मित्रत्त्वाचे नाते यामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. काहीही झालं तरी दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कधी चुकवायची नाही. हा वडिलांचा सल्ला नेहमीच पाळल्याचे नमूद केले.१ शिवचरित्राच्या निर्मितीबद्दल गाडगीळांनी विचारले असता बाबासाहेब म्हणाले, नवव्या-दहाव्या वर्षापासून लिहायला लागलो. शिवचरित्राचे वेड लहानपणापासून होते. याचे मूळ शोधायला गेल्यास आई-वडिलांचे संस्कार असे देता येईल. लहानपणी काही विलक्षण गोष्टी घडल्या. सातत्याने कानांवर प्रेरणादायी, स्फूर्तीदायी पडत होते. पुढे मोठे झाल्यावर डेक्कन महाविद्यालयात काम करत असताना यात अनेकांचे मार्गदर्शन मिळाले.२ भ्रमंती करून, गडकिल्ले फिरून ज्यावेळी शिवचरित्र पूर्ण झाले. त्यानंतर त्याची पुस्तकबांधणी, त्यासाठीचा खर्च, यात संघर्ष करावा लागला. एका मित्राच्या आत्याने १७ हजार रुपयांची मदत केली. त्या व्यक्तीला सहा महिन्यांतच ते पैसे परत केले. अशातच एका मित्राक डून फसवणुकीचा अनुभव आला. एकीकडे फसवणूक तर दुसरीकडे मदत यामुळे भारावून गेलो. यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळी माझ्या शिवचरित्राबद्दल कळले तेव्हा त्यांनी शाबासकी दिली.३ आचार्य अत्रे यांनी तर आपल्या ‘मराठा’ या दैनिकात शिवचरित्रावर अग्रलेख लिहिला. आणि प्रचंड यश मिळाले. १९६८ ते साल होते. किमान २००० प्रतींची आवृत्ती होती. पुढे अवघ्या काही महिन्यांतच पहिली आवृत्ती संपून पुढील आवृत्ती सुरू करावी लागली. ‘पुरंदरेंनी शिवचरित्र महाराष्ट्रात नेले.’ या शब्दांत आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या लेखात स्तुती केली होती, असे सांगताना बाबासाहेब काहीसे भावूक झाले होते.सिर सलामत तो‘पगडी’ पचास...मुलाखत ऐन रंगात आली असताना गाडगीळ यांनी बाबासाहेबांना सध्या पुणेरी पगडीवरून सुरू असलेल्या वादाविषयी काय वाटते? असा प्रश्न विचारला. यावर बाबासाहेब काय उत्तर देतात याकरिता सभागृहातील सर्वांचे कान टवकारले गेले. उत्तर देताना थोडेसे हसून ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असे म्हटल्याबरोबर उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. 

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPuneपुणे