शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची विक्रमी आवक

By admin | Updated: August 24, 2015 02:50 IST

पावसाने पाठ फिरवलेली असतानाही भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत असल्याचे रविवारी घाऊक बाजारात पाहायला मिळाले. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी

पुणे : पावसाने पाठ फिरवलेली असतानाही भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत असल्याचे रविवारी घाऊक बाजारात पाहायला मिळाले. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी आवक झाली. त्यामुळे बहुतेक भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्यांनी घटले. जिल्ह्याच्या अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पण रविवारी बाजारात झालेली आवक पाहता शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसते. सततच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच काही शेतकरी उपलब्ध पाण्यानुसार इतर पिकांपेक्षा भाजीपाल्याची लागवडच करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी बाजारात पुरेसा भाजीपाला येत आहे, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी मार्केटयार्डात सुमारे २५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मागील आठवड्यात ही आवक १७० ते १८० ट्रक एवढीच होती. भाजीपाला घेऊन आलेले टेम्पो सकाळी १० वाजेपर्यंत जागेअभावी खाली करण्यात आले नव्हते. त्यामुळे या मालाला खूप कमी भाव मिळाला. आवक वाढल्याने बहुतेक भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्यांनी घटले. मागील आठवड्याच्या तुलनेत घेवडा व हिरवी मिरचीच्या भावात प्रतिदहा किलोमागे सुमारे १०० रुपयांची घट झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथीसह इतर भाज्यांचे भाव स्थिर राहिले. बाजारात कोथिंबीर व मेथीची अनुक्रमे सव्वा लाख व ४० हजार जुडी आवक झाली.बाजारात परराज्यातून कर्नाटक व मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, इंदौर, कर्नाटक व उटी येथून १ टेम्पो गाजराची आवक झाली. बाजारात पहिल्यांदाच उटी येथून गाजराची आवक झाली आहे. तसेच कर्नाटक येथून ५ ते ६ ट्रक कोबी, इंदौर व आग्रा येथून ५५ ते ६० ट्रक बटाटा आणि मध्य प्रदेशातून सुमारे अडीच हजार गोणी लसणाची आवक झाली. पुणे विभागातून वाई, सातारा, पुरंदर व पारनेर येथून सुमारे ३ हजार गोणी मटार, ६०० गोणी सातारी आले, ६ ते ६.६ हजार पेटी टोमॅटो, ४ ते ५ टेम्पो हिरवी मिरची, २० ते २२ टेम्पो फ्लॉवर, १८ ते २० टेम्पो कोबी, १४ ते १५ टेम्पो सिमला मिरची, ७ ते ८ टेम्पो शेवगा, १०० ते १२५ गोणी भुईमूग शेंग, १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळा आणि १० ते १२ टेम्पो राजमा घेवड्याची आवक झाली. (प्रतिनिधी)