शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:09 IST

वसंत मोरे सध्या मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मविआ उमेदवारी देणार का हे पाहणे गरजेचे आहे

पुणे - Vasant More in Loksabha ( Marathi News ) येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मोहोळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही. मविआत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी हे नाव चर्चेत होते. त्यात नुकतेच वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत लोकसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. 

वसंत मोरे सध्या मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मविआ उमेदवारी देणार का हे पाहणे गरजेचे आहे. तत्पूर्वी याबाबत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, वसंत मोरे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. भाजपाने मित्रपक्षाचा विचार न करता उमेदवारी घोषित केली. परंतु काँग्रेस मित्रपक्षांचा विचार करून निर्णय घेते. सगळ्यांना विचारात घेऊन काँग्रेस निर्णय घेणार आहे. मी काँग्रेसचा उमेदवार नाही. अद्याप पक्षाने तसं जाहीर केले नाही. माझ्यासह २० जणांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठिशी मी उभा राहायला तयार आहे. कारण मी कार्यकर्ता आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वसंत मोरे आणि मी एका पक्षात काम केले आहे. ते काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्ष घेत असतो. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज आहे तसा पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यामागे मी उभा राहणार आहे. मी मित्रासाठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी माघार घ्यायला तयार आहे असंही धंगेकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, पुण्यात मोदींचे मोहोळ आलेत, अजून पुणेकरांचे मोहोळ उठले नाही. ते ज्यादिवशी उठेल तेव्हा भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना रणांगणातून पळून जावे लागेल. जनता लाट आहे. फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या मग पुणेकरांचे मोहोळ उठेल ते बघा असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

वसंत मोरेंच्या भेटीगाठी सुरू

मनसेला रामराम केलेले वसंत मोरे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. गुरुवारी मोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोरे भेटले. पुण्यात वॉशिंग मशिन नको, हे माझे मत आहे असं विधान वसंत मोरे यांनी केले आहे. 

टॅग्स :MNSमनसेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४pune-pcपुणेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी