शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 15:34 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे काल पुण्यात असताना त्यांच्या भेटीसाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु वसंत मोरे न आल्याने त्यांनी मनसे सोडल्याच्या चर्चाना उधाण आले होते. पण आज सकाळी वसंत मोरे औरंगाबादला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यबरोबर ५ ते ६ गाड्यांचा ताफा बरोबर असल्याचे कळाले आहे.    

काल राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी जातीने हजर होते. परंतु या सर्वांमध्ये एका व्यक्तीची मात्र कमी जाणवत होती. ती म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले होते. मात्र वसंत मोरे गैरहजर होते. राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या, पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.परंतु वसंत मोरे औरंगाबादला रवाना झाल्याने पक्ष सोडणार कि काय या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत वसंत मोरे औरंगाबादला पोहोचतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांचे राजीनामे 

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे यासंदर्भात जी भूमिका घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असं देखील जाहीर केलं होतं. तेव्हा वसंत मोरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर काही मनसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र