लाडक्या बाप्पाच्या निरोपाला वरूणराजा बरसरा, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 16:46 IST2023-09-28T16:46:46+5:302023-09-28T16:46:53+5:30

पिंपरी : गुरुवारी सकाळपासून उघडीप दिलेल्या पावसाने सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सुरुवात केली आहे. ढगांचा गडगडात वरुण राजाचे आगमन झाले ...

Varunraja's farewell to beloved Bappa, heavy rain in Pimpri Chinchwad | लाडक्या बाप्पाच्या निरोपाला वरूणराजा बरसरा, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

लाडक्या बाप्पाच्या निरोपाला वरूणराजा बरसरा, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

पिंपरी : गुरुवारी सकाळपासून उघडीप दिलेल्या पावसाने सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सुरुवात केली आहे. ढगांचा गडगडात वरुण राजाचे आगमन झाले आहे.  जोरदार पावसात सुरुवात झाल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे गणेश भक्तांनी घरगुती गणरायाला निरोप दिला. सायंकाळी पावणेचार वाजता दहा मिनिटं पाऊस बरसला. त्यानंतर काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा सव्वाचारला पावसाला सुरुवात झालेली आहे.

ढगांचा गडगडात आणि विजांच्या  लखलखाट होत आहे. तर मिरवणुकीची तयारी करत असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. चिंचवडच्या मिरवणुकीची सुरुवात अजूनही झालेली नाही.

Web Title: Varunraja's farewell to beloved Bappa, heavy rain in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.