माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री नाना पेठेतील नवरंग मित्र मंडळाजवळ आयुष कोमकर (रा. नाना पेठ) याचा पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला.
आयुष कोमकरचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. यामुळे आंदेकर टोळीने मुद्दाम त्याचा मुलगा टार्गेट करून "गेम" केल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. विशेष म्हणजे टोळीने आधी आंबेगाव पठार भागात रेकी केली होती; मात्र हल्ला थेट नाना पेठेच्या मध्यवर्ती भागात घडवून आणण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. उत्सव काळात इतक्या भयानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आंबेगाव पठारात रेकी, हल्ला नाना पेठेतया खुनानंतर तपासात उघड झाले की, आंदेकर टोळीने आंबेगाव पठार परिसरात आधीच रेकी केली होती. या भागात वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आदींची घरे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून संपूर्ण कटाची माहिती समोर आली.
रक्तरंजित सूडाचा संकेतया घटनेवरून आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्याची आग अद्याप धुमसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या भीषण हत्येमुळे गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर आणि पोलिस बंदोबस्तावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.