स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
By किरण शिंदे | Updated: May 23, 2025 19:36 IST2025-05-23T19:36:29+5:302025-05-23T19:36:53+5:30
- पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली.

स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
पुणे – हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबीयांविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे, याच हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या निलेश चव्हाणचे विकृत कारनामे समोर येत आहेत. पुण्याच्या कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या विकृत नराधमाने आपल्या घरात स्पाय कॅमेरे लावून स्वतःच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ तयार केलेत. जेव्हा हा संपूर्ण प्रकार पत्नीच्या लक्षात आला, तेव्हा त्याने पत्नीचाच छळ सुरू केला.
आता मात्र या निलेश चव्हाणच्या पापाचा घडा भरलाय. तर नेमकं काय झालं? निलेश चव्हाण कोण आहे? तो हगवणे कुटुंबीयांच्या संपर्कात कसा आला? जाणून घ्या निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी…
पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील औदुंबर सोसायटीत निलेश चव्हाणचे घर आहे. हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेचं बाळ बेपत्ता झाल्यानंतर निलेश चव्हाणच्या नावाची चर्चा सुरू झाली. हे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात असल्याचं समोर आलं. वैष्णवीचे कुटुंबीय जेव्हा बाळ ताब्यात घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले, तेव्हा त्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना पिटाळून लावलं. मात्र माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवण्यात आलं. आणि तेव्हापासून निलेश चव्हाणच्या नावाची चर्चा सुरू झाली. यानंतर निलेश चव्हाणचे एकेक कारनामे समोर यायला सुरुवात झाली.
पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यांतच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली. आणि याला कारण ठरले – घरात सापडलेले स्पाय कॅमेरे. निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील सीलिंग फॅनला आणि एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकटवलेल्या दिसल्या. तिने याविषयी निलेशकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर घरात सातत्याने अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू दिसू लागल्या. पत्नीने विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करायचा, माहिती लपवायचा. आणि तेच पत्नीला कुठेतरी संशय येण्यास कारणीभूत ठरलं. एके दिवशी, जेव्हा निलेश घरात नव्हता, तेव्हा तिने त्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला धक्काच बसला.
त्या लॅपटॉपमध्ये निलेशने स्वतःच्याच पत्नीसोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आढळून आला. आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूंचा उलगडा झाला. त्या वस्तू दुसरं-तिसरं काही नसून स्पाय कॅमेरे होते. निलेश पत्नीसोबत जेव्हा बेडरूममध्ये असायचा, तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेराच्या मदतीने शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्याच्या त्या लॅपटॉपमध्ये पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे अशाच प्रकारचे अश्लील व्हिडिओही दिसून आले.
निलेशच्या पत्नीने जेव्हा त्याला या व्हिडिओविषयी विचारणा केली, तेव्हा त्याने पत्नीला मारहाण केली, गळा दाबला आणि तिच्यासोबत बळजबरीने लैंगिक संबंध ठेवलेनिलेशच्या पत्नीने जेव्हा सासू-सासर्यांना – म्हणजेच त्याच्या आई-वडिलांना – त्याच्या या काळ्या कृत्याविषयी माहिती दिली, तेव्हा त्यांनीदेखील तिचाच छळ सुरू केला. पुढे अनेक महिने निलेशच्या पत्नीचा शोध लागत होता. अखेरीस तिने निलेशपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने निलेश आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र या प्रकरणात निलेशला अटक झाली नाही. तेव्हा त्याने कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला होता.
निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी असलेल्या करिष्मा हगवणे हिचा जवळचा मित्र आहे. हगवणे कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध होते.शशांक आणि वैष्णवी यांच्यात जेव्हा कौटुंबिक वाद व्हायचे, तेव्हा निलेश चव्हाणही त्यांच्या वादात सहभागी असायचा. निलेश चव्हाणचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय आहे. याशिवाय त्याच्याकडे स्वतःची पोकलेन मशीनही आहे. मात्र हगवणे कुटुंबातील बाळ बेपत्ता झाल्यानंतर हा निलेश चव्हाण चर्चेत आला आणि आता तो पोलिसांच्या रडारवरही आहे.
कस्पटे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश चव्हाणविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कस्पटे कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर बाळाला डांबून ठेवल्याप्रकरणी किंवा किडनॅप केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. मात्र सध्या तरी त्याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एवढं मात्र नक्की – जेव्हा तो पोलिसांना सापडेल, त्याची चौकशी केली जाईल, त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाईल – तेव्हा आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.