शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
4
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
5
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
6
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
7
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
8
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
9
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
10
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
11
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
12
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
13
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
15
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
16
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
17
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
18
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
19
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
20
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:54 IST

ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा रंगल्या होत्या.

पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे  विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला. तर या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का?  अशा चर्चा रंगल्या होत्या. अशात आज गृहविभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे.दरम्यान, सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप करण्यात आले.त्यावर ‘आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही’, असे सुपेकर यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत ‘कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे,’ या संदर्भातील क्लिप ऐकविली. ‘याची सत्यता मी तपासली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठविली होती. त्यांनी तपासून कारवाई करावी’, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. यानंतर आज जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने कारवाई केली आहे. तर या सर्व आरोपांवर डॉ. जालिंदर सुपेकर यांनी माध्यमांशी बोलतांना आपली बाजू मांडली होती. माझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही बनावट असून, आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे  अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या  संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे