लाचप्रकरणी वैद्यला २ दिवसांची कोठडी

By admin | Published: July 23, 2015 04:25 AM2015-07-23T04:25:01+5:302015-07-23T04:25:01+5:30

शिक्षक व स्वयंपाकीच्या पदांना मान्यता देण्यासाठी २ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या समाजकल्याण विभागातील प्रादेशिक उपायुक्त माधव रखमाजी

Vaidya gets 2 days custody | लाचप्रकरणी वैद्यला २ दिवसांची कोठडी

लाचप्रकरणी वैद्यला २ दिवसांची कोठडी

Next

पुणे : शिक्षक व स्वयंपाकीच्या पदांना मान्यता देण्यासाठी २ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या समाजकल्याण विभागातील प्रादेशिक उपायुक्त माधव रखमाजी वैद्य (वय ५३, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने याने यांनी २ दिवस पोलीस कोठडी सुनावली. वैद्य याने १० लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर शिपायी नरहरी सोनबा तेली (वय ४४, महादेवनगर, सिंहगड रस्ता) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी कारवाई करून दोघांना अटक केली होती. नांदेड जिल्ह्यातील वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळेच्या अध्यक्षांनी फिर्याद केली. या शाळेतील ४ प्राथमिक शिक्षक व स्वयंपाकी पदांना मान्यता देऊन सेवेत सलग ठेवण्याबाबतच्या कागदपत्रांना मंजुरीचे अधिकार समाज कल्याणच्या लातूर उपायुक्त कार्यालयास होते. लातूर येथेच पदावर असताना त्यांनी या चार शिक्षक व स्वयंपाकीला पदाला मान्यता देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० लाख रूपये देण्यात आले. मात्र त्यानंतरही ३ शिक्षक व १ स्वयंपाकी यांची मान्यता दिली. मात्र एका शिक्षिकेचे पदाला कागदपत्रात त्रुटी दाखवून मान्यता दिली नाही. यासाठी पुन्हा ४ लाखांची मागणी केली. दरम्यान वैद्य यांची ४ जुलैला पुण्यात प्रादेशिक उपायुक्तपदी नियुक्ती झाली. संबंधित शिक्षण संस्था चालकास त्यांनी मागील तारखेला प्रकरण मंजूर करण्याचे आमिष दाखविले. तडजोड करून २ लाखांची लाच मागितली. (प्रतिनिधी)

Web Title: Vaidya gets 2 days custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.