आंबेगाव तालुक्यातील १४ उपकेंद्रांवर लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST2021-04-02T04:10:48+5:302021-04-02T04:10:48+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय घोडेगाव, भीमाशंकर रूग्णलाय मंचर, गेटवेल रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे, धामणी, डिंभे, ...

आंबेगाव तालुक्यातील १४ उपकेंद्रांवर लसीकरण सुरू
येथील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय घोडेगाव, भीमाशंकर रूग्णलाय मंचर, गेटवेल रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे, धामणी, डिंभे, महाळुंगे पडवळ, निरगुडसर, पेठ, तळेघर ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. आता १ एप्रिलपासून तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे तिरपाड, फुलवडे, अवसरी बु., पारगाव, गंगापुर बु., गिरवली, चास, कळंब, रांजणी, अवसरी खुर्द, कुरवंडी, कुशिरे बु., पोखरी व तेरूंगण या चौदा उपकेंद्रांमध्ये कोरोना लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाला जाताना आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, चालक परवाना यापैकी कोणतेही ओळखपत्र घेवून नागरिकांनी लसीकरणास जावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे.