शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 7:47 PM

रुग्णसंख्या कमी होत असल्यानं शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू होण्याची शक्यता

ठळक मुद्देग्रामीणमध्ये ९५ टक्के तर शहरात ५० - ५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण

पुणे : गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरासह ग्रामीण भागातील देखील रुग्णसंख्या चांगलीच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकतात. परंतु आजही पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल २० हजार ६२७ शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचा-यांचं लसीकरण (Vaccination) पूर्ण झालं नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शासकीय शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी लसीकरणाकड पाठ फिरलवी आहे. 

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली तमिळनाडूसह अन्य काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात देखील शाळा सुरू करण्याची मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत देखील याबाबत चर्चा होऊ शकतो. शिक्षण विभागाने राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडे शाळा सुरू करण्याबाबत कोणती खबरदारी घेता येईल, याची विचारणा केली होती.

शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुणे जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुणे जिल्ह्यात शासकीय शाळेत २८ हजार ८९९ तर खाजगी शाळांमध्ये ३१  हजार ३१५ शिक्षक काम करतात. जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या 60 हजार 250 ऐवढी आहे. यापैकी अद्याप ही २० हजार ६२७ शिक्षक व शिक्षकेतर लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. 

ग्रामीणमध्ये ९५ टक्के तर शहरात ५० - ५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण 

ग्रामीण भागात शासकीय व खाजगी दोन्ही  सुमारे ९५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर शहरी भागात  प्रमाण ५० - ५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास पुणे शहरातील अनेक शाळांना शिक्षकांचे लसीकरण अपूर्ण असल्याने अडचण येऊ शकते. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSchoolशाळाTeacherशिक्षक