लसीकरण केंद्र व लस उपलब्धतेची माहिती आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:11 AM2021-05-14T04:11:59+5:302021-05-14T04:11:59+5:30

पुणे : शहरातील लसीकरण केंद्राचे ठिकाण, लस उपलब्धा आदी माहिती व लसीकरण केंद्र व आपल्या घरापासूनचा रस्ता याचा गुगल ...

Vaccination center and vaccine availability information now with one click | लसीकरण केंद्र व लस उपलब्धतेची माहिती आता एका क्लिकवर

लसीकरण केंद्र व लस उपलब्धतेची माहिती आता एका क्लिकवर

Next

पुणे : शहरातील लसीकरण केंद्राचे ठिकाण, लस उपलब्धा आदी माहिती व लसीकरण केंद्र व आपल्या घरापासूनचा रस्ता याचा गुगल मॅपच आता पुणेकरांना एका क्लिकवर मिळणार आहे़ पुणे महापालिका व एमसीसीआयए यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला आहे़

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या डॅशबोर्डचे उदघाटन गुरूवारी केले़ यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल उपस्थित होते

http://www.punevaccination.in/ या संकेतस्थळ लिंकवर हा डॅशबोर्ड उपलब्ध असणार आहे़ या डॅशबोर्डवर नागरिकांच्या लोकेशननुसार त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती, लसीकरण केंद्र, केंद्रावर असलेली लस, डोसची संख्या इत्यादी, माहिती नागरिकांना समजावी या उद्देशाने सर्व माहिती अपलोड केली जाणार आहे़

तसेच दररोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशीसाठी लसीकरण केंद्रांवर कुठल्या वयोगटासाठी लस उपलब्ध असेल, कुठल्या कंपनीची लस राहिल व तेथे कितवा डोस दिला जाणार याचीही माहिती या डॅशबोर्डवर मिळणार आहे़ दरम्यान लसीचे जसा पुरवठा महापालिकेला वाढेल त्या प्रमाणात आवश्यक माहिती व केंद्रांची वाढीव माहितीही या डॅशबोर्डवर उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी यावेळी दिली़

---

फोटो : लसीकरण केंद्र व लस उपलब्धतेची माहिती आता एका क्लिकवर मिळणार असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या डॅशबोर्डचे उदघाटन गुरूवारी केले़

(फोटो - पुणे डॅशबोर्ड नावाने)

Web Title: Vaccination center and vaccine availability information now with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.