पुणे शहरात सोमवारी 72 केंद्रांवर लसीकरण! जाणून घ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:23 IST2021-06-06T20:19:08+5:302021-06-06T20:23:35+5:30

५६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन

Vaccination at 70 centers in Pune on Monday! Learn covshield and covacin planning | पुणे शहरात सोमवारी 72 केंद्रांवर लसीकरण! जाणून घ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नियोजन

पुणे शहरात सोमवारी 72 केंद्रांवर लसीकरण! जाणून घ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नियोजन

ठळक मुद्देकोव्हिशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार, तर १० मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

पुणे: पुणे महापालिकेच्या ५६ केंद्रांवर उद्या (सोमवारी) कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़. याव्दारे कोव्हिशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी १० मे पूर्वी घेतला आहे. त्यांनाही नोंदणी करता येणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या नागरिकांना दिली जाणार आहे. तर उर्वरित ४० टक्के लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल. तसेच शिल्लक डोस हे १५ मार्च पूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.

१० मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध 

ज्या नागरिकांनी १० मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़  यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़.  

Web Title: Vaccination at 70 centers in Pune on Monday! Learn covshield and covacin planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.