शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

व्ही शांताराम ते ओम पुरी व्हाया संजय लीला भन्साळी : कुटुंबाचा 'बाणेदार' प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:53 IST

पुण्यातल्या  बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे.  

ठळक मुद्देतारे तारकांच्या असंख्य आठवणी आणि किश्श्यांचा खजिना  पुण्यातल्या बाणेदार कुटुंबाचा प्रभातपासून एफटीआयआयपर्यंत प्रवास 

पुणे : कपूर, खान, बच्चन कुटुंब अभिनय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे म्हटले जाते. इतकेच काय तर त्यांचे कुटुंबाचे फोटोही मोठ्या उत्सुकतेने बघितले जातात. याच रांगेत बसणाऱ्या पुण्यातल्या  बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे. 

    भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेची (एफटीआयआय) स्थापना १९६० साली करण्यात आली. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म कंपनीच्या जागेवर उभी राहिली असून त्यात बाणेदार कुटुंबातील हुसेन मेहमूद बाणेदार वाहनचालक म्हणून कामाला होते. त्याचा मुलगा रसूल यांनी प्रभातच्या जागी सुरु झालेल्या एफटीआयआयमध्ये वाहनचालकाचे काम केले. आता तिसऱ्या पिढीत रसूल यांचा मुलगा याकूब हे देखील एफटीआयआयमध्ये काम करत आहेत. त्यामुळे गेले तीन पिढ्या हे कुटुंब सिनेक्षेत्राशी जोडले गेले असून या तिघांनीही 'कमी तिथे आम्ही' अशा स्वरूपाची कामे केली आहेत.

 हुसेन यांच्या कामावर प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर इतके खुश झाले की त्याकाळात त्यांनी हुसेन यांना ओपेल ही चारचाकी गाडी भेट दिली. पुढे काही काळात प्रभात कंपनी संपुष्टात आल्यावर बाणेदार कुटूंबाने एफटीआयआयची साथ सोडली नाही. तिथे प्रॉडक्शन विभागात कामाला असलेल्या रसूल यांनी अनेक तारे-तारकांना एफटीआयआयमध्ये जवळून बघितले. प्रसिद्ध गायक शैलेंद्र सिंग यांचा आवाज ऐकून त्यांना अभिनेता नाही तर गायक होण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यांचा हा सल्ला ऐकून गायक झालेले सिंग स्वतः त्यांचे आभार मानण्यासाठी आल्याची आठवण त्यांनी सांगितली. 

आजही रसूल यांना भेटल्याशिवाय शत्रुघ्न सिन्हा एफटीआयआयबाहेर जात नाही, शबाना आझमी त्यांना घरच्यासारख्या असून पुण्यात आल्या की आवर्जून घरी बाणेदार यांच्या घरी हजेरी लावतात. तिसऱ्या पिढीतले याकूब हेदेखील एफटीआयआयमध्ये कार्यरत असून काही चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. आज हे कुटुंब प्रभात रस्त्यावर एफटीआयआय क्वार्टरमध्ये राहत असून त्यांच्याकडे लाखोंची संपत्ती नसली तरी जगाला माहिती नसणाऱ्या अनेक तारे-तारकांच्या असंख्य आठवणी आहेत हे मात्र नक्की !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेShabana ajhamiशबाना आझमीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाFTIIएफटीआयआय