शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 22:53 IST

राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार

ठळक मुद्देयाप्रकरणी क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या पुणे कार्यालयातील प्रभारी उपसंचालकाची फिर्याद

पुणे : राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी एकाने क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी भारतीय तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे, तुषार वसंतराव चौधरी (रा. पाटकुले, ता़ मोहोळे, जि़ सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या पुणे कार्यालयातील प्रभारी उपसंचालक विजय संतान यांनी येरवडा पोलिसांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य कर विभागात चौधरी निरीक्षक पदावरील नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होता. क्रीडापटूंसाठी आरक्षण असल्याने चौधरी तलवारबाजीत प्राविण्य मिळविल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न सुरु केले होते. भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे यांना बनावट प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्राची शहानिशा न करता दुधारे याला प्रमाणपत्र दिले. चौधरी याने हे प्रमाणपत्र क्रीडा आणि युवक सेवा विभागाकडे सादर केले. त्याची पडताळणी करण्यात आली असता चौधरी राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी संघात महाराष्ट्राकडून सहभागी झाला नसल्याचे उघडकीस आले. या स्पर्धेत मणीपूर संघाने सुवर्ण पदक मिळविले होते. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश संघाने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळविले होते. हे पडताळणीत उघड झाले. चौधरी याने बनावट कागदपत्रे सादर केली व या कागदपत्रांची पडताळणी न करता दुधारे यांनी प्रमाणपत्र तयार करुन दिल्याचे उघड झाल्याने क्रीडा विभागाने दोघांविरुद्ध नोकरी मिळविण्यासाठी शासनाची फसवणुक केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसjobनोकरी