शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:53 PM

अनेकांची मंदीतील संधी मात्र हुकली !

ठळक मुद्देउरुळी कांचनच्या सरपंचाविरोधात सोळापैकी आठ सदस्यांनी केला होता अविश्वास ठराव दाखल

उरुळीकांचन : उरुळी कांचनच्यासरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सोमवारी (ता. २०) होणारी बैठक राज्य शासनाच्या ५ मार्च २०२० च्या शासन सुधारणा पत्रातील आदेशानुसार रद्द झाल्याने सरपंच राजश्री वनारसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधात सोळापैकी आठ सदस्यांनी मागील सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी यांनी अविश्वास ठरावावर चर्चेसाठी सरपंच राजश्री वनारसे यांच्यासह सोळा सदस्यांना सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याबातच्या नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक आज (शनिवारी) सकाळी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यास मनाई केल्याने, राजश्री वनारसे यांच्याविरोधातील सदस्यांची ‘मंदीतील संधी’ हुकली आहे.      दरम्यान, राज्य शासनाच्या ५ मार्च २०२० च्या शासन सुधारणा पत्रातील आदेशानुसार विद्यमान ग्रामपंचायतीची मुदत संपायला सहा महिण्यापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही ही बाब सरपंच राजश्री वनारसे यांनी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेटून निदर्शनास आणून दिली होती. याच नियमांचा आधार घेऊन गरज भासल्यास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीच्या नोटीस काढण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत केलेल्या तयारीला हे यश आले. तसेच मला न्याय मिळाला, मात्र यात नेमका हलगर्जीपणा की राजकीय षडयंत्र असा सवाल राजश्री वनारसे यांनी उपस्थित केला आहे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार प्रक्रिया रद्द : सुनिल कोळी उरुळी कांचनच्या सरपंचाविरोधात ठराव तहसिल कार्यालय प्रशासनाने दाखल करुन घेतला असला तरी, त्यावर नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी विचारणा केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसारच गुरुवारी सदस्यांना नोटीसा पाठवल्या होत्या, मात्र शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला पूर्वींचा आदेश फिरवल्याने राजश्री वनारसे यांच्यावरील अविश्वास ठरावाची प्रक्रिया रद्द केलेली आहे. सुनिल कोळी,तहसिलदार, हवेली.

 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनWomenमहिलाsarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारीState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायत