शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या पुण्यातून अपलोड झाले ५०० चाईल्ड पॉनोग्राफी व्हिडिओ ; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 21:02 IST

भारतात चाईल्ड पॉनोग्राफीला बंदी असून असे व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिले होते़. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सुमारे ३५ हजार चाईल्ड पॉनोग्राफीचे आयपी अ‍ॅड्रेस विविध राज्यातील पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आले होते़. 

पुणे : भारतात चाईल्ड पॉनोग्राफीला बंदी असून असे व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिले होते़. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सुमारे ३५ हजार चाईल्ड पॉनोग्राफीचे आयपी अ‍ॅड्रेस विविध राज्यातील पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आले होते़. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून ते त्या शहरातील सायबर पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले असून पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून सुमारे ५०० हून अधिक चाईल्ड पॉनोग्राफी अपलोड करण्यात आले आहेत.पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यातून या आयपी अ‍ॅड्रेसवरुन संबंधितांचा मोबाईल क्रमांक शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे़. याबाबत खडक पोलीस ठाण्यात  चाईल्ड पॉनोग्राफीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे़. तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलाने अपलोड केला असल्याचे निष्पन्न झाले आहे़.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई समीर पटेल यांनी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़. या फिर्यादीवरुन पोलिसांनी राज करण पुट्टीलाल (रा़ गुरुवार पेठ) यांना अटक केली आहे़. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम १४ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याबाबतची माहिती अशी, राज करण पुट्टीलाल याच्या मोबाईलवरुन २८ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेअकरा वाजता लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड करण्यात आला होता. पोलीस महासंचालकांकडून मिळालेल्या आयपी अ‍ॅड्रेसच्या मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या मोबाईलवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले़. हा मोबाईल जरी त्यांच्या नावावर असला तरी त्यांनी त्याचे सीमकार्ड आपल्या काकाच्या मुलाला दिले होते़. हे सीम कार्ड त्यांचा काकाचा मुलगा वापरत आहेत़. त्याने तो गेल्या वर्षी अपलोड केला होता़,विशेष म्हणजे त्यावेळी तो अल्पवयीन होता़. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस