शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

शस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांमुळेच अशांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 2:57 AM

धर्माच्या आधारावर देश टिकत नाही हे उदाहरण आपल्याला पाकिस्ताननेच दाखवून दिले आहे.

- संजय नहारधर्माच्या आधारावर देश टिकत नाही हे उदाहरण आपल्याला पाकिस्ताननेच दाखवून दिले आहे. दोन्ही देशांना भेडसावणारे अनेक सामाजिक प्रश्न आहेत. मात्र, शस्त्रास्त्रे निर्माण करणारे व्यापारी, देश शांतता नांदू देत नाही हे सत्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असे चित्र उभे केले जात आहे, की पाकिस्तानपासून आपल्याला त्रास होतो आहे, आपण त्यांच्यासमोर कमी पडत आहोत. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. त्यांनी आपला एक सैनिक मारला असेल, तर आपण त्वरित त्यांचे दोन मारले आहेत. मात्र, हा काही क्रिकेटचा सामना नाही की त्यांनी चौकार मारला की आपण षटकार मारायचा. अशा घटना घडल्या की त्याचा अभ्यास करायचा असतो, आपण तो करत नाही.आपण एक गोष्ट नेहमीच विसरतो की आपण त्या देशाचे दोन तुकडे केलेले आहेत. धर्माच्या आधारावर त्यांनी फाळणी मान्य केली, मात्र धर्माच्या आधारावर देश उभा राहू शकत नाही हे त्यांना कळाले. आता त्यांच्याकडे कसलाही मुद्दा नाही, त्यामुळे भारत द्वेष या एकमेव मुद्द्यावर त्यांचे सगळे राजकारण सुरू असते. दुर्देव असे की आपल्याकडे त्यांचे अनुकरण केले जाते. आपल्याकडेही आता लष्करी राजवटीचे आकर्षण निर्माण झाले आहे जे हिताचे नाही. दोेन्ही देशांमध्ये बेरोजगारी, शिक्षण, असे कितीतरी प्रश्न आहे. युद्ध कधीही हिताचे नसते. एका सर्जिकल स्ट्राईकचा खर्च ११ हजार कोटींचा होता असे आता बाहेर येत आहे.शस्त्रास्त्रे निर्माण करणाऱ्यांना दोन शेजारी देशांमध्ये सख्य निर्माण झालेले कधीच आवडणार नाही. तसे झाले तर त्यांचा व्यापार चालणारच नाही. त्यामुळे ते भांडणे लावण्यात व आमची शस्त्रे घ्या असे सांगण्याचेच काम करतात. आपणच आता विचारशील होणे गरजेचे आहे.(संस्थापक, सरहद संस्था, पुणे.)>नोटाबंदीसारखा युद्धाचा निर्णय नकोदोन वर्षा पूर्वी मला एका लग्ना निमित्त पाकिस्तानला जाण्याचा योग आला होता. मी पत्नीसह तब्बल ९ दिवस कराचीत होतो. कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव मला आला नव्हता. जशी आपली सर्वसामान्य जनता आहे तसेच तिथेही आहे. काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या नादात, पंतप्रधानांकडून जसा नोटाबंदीचा निर्णय अचानक एका रात्रीत लादला गेला, पण त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. त्याप्रमाणे युद्धाचा निर्णय एकतर्फी व अचानक नको. दोन्ही देशांत चर्चा व्हायला हरकत नाही.- अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार , माजी अध्यक्ष - पुणे जिल्हा बार असोसिएशन>युद्ध नको अन् गाफीलपणाही...युद्ध दोन्ही देशाला परवडणारे नाही. युद्धात अनेक सैनिक धारातीर्थी पडणार, मनुष्यहानी होणार. युद्ध करा, असे आपणास म्हणायला खूप सोपे आहे; पण शहीद झालेल्या सैनिकांच्या घरी एकदा डोकावून बघा. दुसरी गोष्ट नोटाबंदीमुळे अगोदरच आर्थिक संकट भारतापुढे आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशात शांततेचा मार्ग न घेता युद्धाची भाषा चूकच आहे. परंतु पाकिस्तानवर विश्वास ठेवून गाफील राहून पण चालणार नाही.- गुरुकुमार कांबळे,चंद्रव्हान, ता. वसमत, जि. हिंगोली.

यांचीही पत्रे मिळालीमुंबई - तुषार रमेश माने, घोडपदेव रोड, गोपाळ जाधव - कोपर खैरणे, दिनेश अडसुळे - हायकोर्ट वकील, गजानन केशव जोशी - अंधेरी, अनिल तुकाराम तुपारे - खारघर,पश्चिम महाराष्ट्रकोल्हापूर - सेरा इर्शाद नदाफ - जयसिंगपूर.पुणे - गणेश ज्ञानेश्वर भालेराव - दांडेकर पूल, समाधान रामचंद्र सापते, सागर निंबडे, आदेश नथु पोळेकर - कोथरुड, कमलाकर गोविंद बडवे - ४९८, नारायण पेठ. शांताराम वाघ - मोशी, प्राधिकरण. माधवराव बामणे - पीसीएनटी प्राधिकरण, संतोष किसन वाडघरे - अरण्येश्वर, प्रविण भरत कांबळे - भोर, तात्यासाहेब गणपतराव जाधवर - खेडशिवापूर, हवेली. देवेंद्र मोहन जाधव - जाधववाडी, चिखली. प्रा. बी. ए. कांबळे - भोलावडे, भोर. सां. रा. वाठारकर आणि प्रसाद यशोधन ब्रम्हे - चिंचवड, बळवंत सीताराम बोंबे - पिंपरखेड, शिरुर. राहुल सोपान वाघमारे - राजगुरुनगर, जोसेफ साकरे - फुलेनगर, आळंदी रोड. प्रल्हाद म्हस्के - रहाटणी, शशीकांत हरिसंगम - बारामती, श्याम बसप्पा ठाणेदार - दौंड, ज्योती शिरीष शेलार - वारजे, निकीत राजेंद्र जाधव - रावेत, हवेली.सोलापूर - विक्रम लक्ष्मण भीमराठी, मोहन आंग्रे, मुरलीधर काळे - बोरामणी, श्रीनिवास अणवेकर - बार्शी, तुकाराम भांडवले - आंबेगाव पठारकोकणरत्नागिरी - सुचितकुमार राजाराम गुणदेकर - दाभिल, लवेल - ता. खेड.ठाणे - अदिती किरण वाळिंबे - वांगणी, बदलापूर. श्रीकांत मुकुंद पोलेकर - बेलवली, बदलापूर. गोविंद मोतीराम धुम - कल्याण, अनंत बोरसे - शहापूर,रायगड - चित्तरंजन सुधाकर लाड - पनवेल, सुधीर वैद्य - जुने पनवेल.उत्तर महाराष्ट्रअहमदनगर - प्रवीण लक्ष्मण सोनवणे-पाटील, हिंगणगाव. कल्पना प्रकाश पवार - चिंचोली, संगमनेर. सचिन कांबळे आणि प्रभाकर भोंगळे - श्रीरामपूर, राजा पगारे - चांगदेवनगर, राहाता. अमित अभय मुथा - श्रीरामपूर, ज्ञानेश्वर रामदास कवडे - पाबळ, लोणीमावळा, ता. पारनेर. शोयेब सऊद शेख - नाईकवाडपुरा, संगमनेर. अक्षय भाऊसाहेब गुंजाळ - संगमनेर, सौरभ मेढे - सावेडी,नाशिक - आशिष राजेंद्र मोहिते, अविनाश पाटील, विलास धोंडगे - सातपूर, बापू कारबारी चतुर - सिन्नर, नयना पगार - मालेगाव, आसिफ रहीम अत्तार - मनमाड,खान्देशजळगाव - श. मु. चौधरी, अश्वजीत मनोहर घरडे - पींप्राळ, बुद्धभूषण भाऊसाहेब निकम - गाडगेबााबानगर, पाचोरा. जयदिप सुरेश बाविस्कर - महिंदळे, भडगाव. रोहन अशोक राजपूत - जंगीपुरा, शेंदुर्णी, ता. जामनेर. शामकांत बोरसे - भडगाव, वैभव नामदेव रत्नपारखी - भुसावळ, नीतीन रमेश जैन - घोडगाव, चोपडा.धुळे - अ‍ॅड. एस. झेड. माळी.मराठवाडाऔरंगाबाद - डॉ. अनघा घोडके जैन, अश्विनी लक्ष्मणराव पाटील, विराज प्रल्हाद रिंढे, प्रथमेश रोडगे, सौरभ पुंड, शकुंतला प्रल्हाद पांडे, आकाश वाघ, विवेक श्रीकृष्ण चोबे, पंकज भुसारी आणि प्रथमेश पाटील. ओंकार खोत - विठ्ठलनगर, सिडको. सूरज अरुण तोतला - बिडकीन, पैठण. निलेश गजभार, गुरव - चिंचोली, कन्नड. मोहम्मद अशखान हसन - पडेगाव. सागर मेथे आणि कृष्णा जंजाळे - गुरूधानोरा, गंगापूर. संजय हनुमंतराव दळवी - जाधववाडी, कृष्णा भाऊसाहेब म्हसरूप - अगरवाडगाव, गंगापूर. गणेश माधवराव घनवट - पांगरा, पैठण. युवराज वाकडे - टाकली अंबड, ता. पैठण. राहुल प्रल्हाद घोटकर - भिवधानोरा, गंगापूर. विशाल टिप्रमवार - बडकवस्ती, सिल्लोड. सुभाष जयराम भोपळे - भोकरगाव, वैजापूर. रंजना जोशी - पैठण, राजेंद्र शिंपी - कन्नड.नांदेड - निलेश भुजंगराव धुतमल, गणेश शिंदे - शिरुर, कौठा, ता. कंधार. ज्ञानेश्वर देवराम साखरे - अर्धापूर.बीड - मनोज देवराव गायकवाड - माजलगाव, पार्श्वनाथ चंद्रकांत महापूरकर - सावरगाव, ता. माजलगाव. अल्ताफ शेख - तागादाव, शिरुर. अत्रेय ईटके - परळी वैजनाथ, सुचिता नानासाहेब मस्के - भाळवणी, पिंपळवाडी.जालना - राज ठोंबरे, उद्धव भगवानराव मोरे - देवठाणा, मंठा. ज्ञानेश्वर कोल्हे - चांदई, भोकरदन. कपिल विलास भोजने - शिरनेर, अंबड.उस्मानाबाद - अशोक कोरपे, अजय चंद्रकांत गायकवाड - मुरुम, उमरगा. ऋषिकेश साळुंके - घारगाव, कळंब. विकास लक्ष्मण घोडके - मोघा खुर्द, लोहारा. गणेश अंबादास जळके - तुळजापूर.परभणी - समीर शेख, प्रताप मंजुभाऊ अंभुरे - जिंतुर, रन्हेर नारायण बाळासाहेब - वाडी.विदर्भनागपूर - नानेश चव्हाण, संजय दत्तात्रय उपगडे, राजेंद्र नकाथे, मुकुंद नागोराव काकीरवार, भावना खांडवाये - हिंगणा, संजय प्र. डब्ली - धंतोली, राहुल लक्ष्मणराव रक्षित - काटोल.यवतमाळ - संदीप संजयराव तळेगावकरअमरावती - योगेश महादेवराव पखालेचंद्रपूर - अमिलाषा नंदकिशोर मैंदळकर. नारायण परांजपे - बल्लारपूर. मारोती बाबाराव डोंगे - कोरपना.गोंदिया - नटवरलाल गांधी - आमगाव.गडचिरोली - डॉ. अशोक वनमाळी - वैरागड, ता. आरमोरी.बुलडाणा - सौरभ मोहन पेठकर - खामगाव.वाशिम - प्रदीप अशोक पेंढारकर. रूपेश गजाननराव उचित - बाळदेव, मंगळूरपीर. गणेश वाळूंकर - जोगेश्वरी, रिसोड. राजेश केशव धांडे - करडा, अरुणकुमार कुलकर्णी - मालेगाव, संतोष प्रल्हाद लिंगे - हराळ, रिसोड.अकोला - सचिन प्रल्हादराव डोंगरे, किरण माळी - उरळ खुर्द, ता. बाळापूर. सारिका संदिप कुलकर्णी - अकोट, अभिषेक सुरेश पाटील - खामगाव, हरिश जीवन कल्याणकर - मोठी उमरी, प्रवरसेन अशोक जंजाळ - मोरगाव भाकरे.गोवा - प्रमोद फोंडू वेलीप, मोरपिर्ला, भारदे, जि. द. गोवा.