आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:49 IST2019-08-10T21:44:34+5:302019-08-10T21:49:31+5:30
येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य
आळंदी : येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महाराजावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.
महाराजाचे नाव लहू अर्जुन गायकवाड (रा. सिद्धेबेट, मूळ गाव जांगलादेवी, घनसांगवी, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा येथील सिद्धबेट परिसरातील श्रीसंत ज्ञानराज माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत लहू गायकवाड या महाराजाकडे आधात्मिक शिक्षण घेत आहे. विद्यार्थी येथील एका खासगी शिक्षण संस्थेत दहावीच्या वर्गात शिकत आहे. महाराजाने अल्पवयीन मुलावर दि.१, ३ व ७ रोजी बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना मुलाने त्याच्या मित्रांना सांगितली.
त्यांनी हा प्रकार स्वत: पाहिला. यानंतर मुलाने भोसरीला आपल्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला. या पूर्वीही या महाराजाचे गैरप्रकार समोर आले आहे. यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा महाराज ३० मुलांना आपल्या खासगी संस्थेत शिकवत आहे. त्याची पत्नी व एक नातेवाईक देखील त्यांच्या सोबत येथेच राहतात. या घटनेमुळे आळंदीत खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वीही देखील अशीच घटना घडली होती.