शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

प्राण्यांचा होतोय अनैसर्गिक मृत्यू : कात्रज प्राणी संग्रहालयातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 13:35 IST

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय राज्यातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय मानले जाते. जवळपास १८१ प्राण्यांचा मृत्यू हृदय विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्ग, रक्ताभिसरणासंबंधीचे आजार अशा विविध कारणांमुळे झाला आहेत.

ठळक मुद्देहृदयरोग, श्वसनविकार, किडनी विकाराने मृत्यूचे प्रमाण अधिकगेल्या आठ वर्षांत प्राणी संग्रहालयातील २११ विविध प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू

विशाल शिर्के  

पुणे :  कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या ८ वर्षांत मृत्यूमुखी पडलेल्या २११ प्राण्यांपैकी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक झाल्याची माहिती हाती आली आहे. हृदयरोग, किडनी विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्गाचे प्रमाण जास्त असून, प्रसूती आणि प्राण्यांमधील भांडणामुळे देखील काहींचा मृत्यू झाला आहे. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय राज्यातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय मानले जाते. जलचर, सरपटणारे आणि विविध प्रकारचे सस्तन प्राणी येथे पाहायला मिळतात. त्यात विविध प्रकारचे साप, मगर, सुसर, कासव, वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हरण, काळवीट, गवा, साळींदर, लांडगा, कोल्हा, मोर, गरुड, गिधाड अशा विविध प्रकारच्या प्राण्यांचा त्यात समावेश आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१०-११ पासून) प्राणी संग्रहालयातील २११ विविध प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या प्राण्यांचा मृत्यू वार्धक्यामुळे झाला आहे. तब्बल १७ प्राण्यांचा मृत्यू हा आपापसातील भांडणामुळे झाला असून, केवळ १३ प्राण्यांचा मृत्यू हा वार्धक्यामुळे झाला आहे. भांडणात एक स्पॉटेड डीअर, ३ सांबर ३, प्रत्येकी ४ बार्कींग डीअर, चिंकारा आणि काळविटाचा मृत्यू झाला. तर, मांजर आणि कोल्हा यांचे देखील भांडणात बळी गेले आहेत.  जवळपास १८१ प्राण्यांचा मृत्यू हृदय विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्ग, रक्ताभिसरणासंबंधीचे आजार, रक्तस्त्राव, मूत्रपिंड-हृदयरोग असे एकापेक्षा अधिक अवयव निकामी होणे, अशा विविध कारणांमुळे झाले आहेत. एका जंगली मांजराने दुसºया मांजराची शिकार करुन मांस भक्षण केल्याची घटना २७ एप्रिल २०१७ रोजी घडली. गेल्यावर्षी २ आॅगस्टला एका दणकट चिंकाराने कळपातील साथीदाराचा पाठलाग केल्याने आणि ७ नोव्हेंबरला एका दणकट काळवीटाने दुसºया काळवीटावर धावा बोलल्याने हृदय विकाराचा झटका आल्याने काळवीट आणि चिंकाराला प्राण गमवावे लागले. गर्भात संसर्ग झाल्याने २ चिंकारांना प्रसूती दरम्यान प्राण गमावावे लागले आहे. जवळपास ४१प्राण्यांना हृदय विकार आणि श्वसन विकाराने मृत्यू आला आहे. त्यात चिंकारा ५, काळवीट १०, कोल्हा ३ , बार्कींग डीअर ६, मकॅक माकड २, चारशिंगा, स्पॉटेड डीअर ४ , नीलगाय २, मांजर २, सांबर ३ आणि प्रत्येकी एका गवा, लांगडा, बंगाल टायगरचा यात जीव गेला आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. --------------------------------

टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयDeathमृत्यू