विद्यापीठाचा सुधारित निकाल 15 डिसेंबरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:20+5:302020-12-08T04:11:20+5:30
विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. काही विषयांच्या परीक्षा तांत्रिक कारणास्तव पूर्ण न होणे, प्रश्न न दिसणे ,वेळेपूर्वी प्रश्नपत्रिका ...

विद्यापीठाचा सुधारित निकाल 15 डिसेंबरपर्यंत
विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. काही विषयांच्या परीक्षा तांत्रिक कारणास्तव पूर्ण न होणे, प्रश्न न दिसणे ,वेळेपूर्वी प्रश्नपत्रिका सबमिट होणे आधी कारणांमुळे विद्यार्थ्यांना निकालांमध्ये अनुपस्थित किंवा शून्य व कमी गुण मिळाले, असल्याचे निदर्शनास आले. निकालाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तर त्यांनी osd.exam@unipune.ac.in या मेल आयडी वर येत्या 9 डिसेंबर पर्यंत रहा पाठवाव्यात, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.
अनेकांच्या निकालात अजूनही त्रुटी
णे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निकाल जाहीर केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे निकालात चुका झाल्या असल्याची तक्रार केली त्यावर विद्यापीठाने ३ डिसेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी कायम राहिल्या. त्यावर युक्रांतसह विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला याचा जाब विचारला.