शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत; पंजाबची प्रेयसी अन् भिगवणच्या प्रियकराची अनोखी "प्यारवाली लव्ह स्टोरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 21:31 IST

पंजाब राज्यातील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही स्टोरी... 

भिगवण : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानले जाते. मात्र, मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तेही जातपात ,धर्म, प्रांत आणि  भाषा यांना फाटा देत पंजाब राज्यातील तरुणी महाराष्ट्र राज्यातील तरुणाच्या प्रेमात पडली. इतकंच काय  पंजाबमधील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही ''प्यारवाली लव्ह स्टोरी''पाहून पोलिसांनी पण कपाळाला हात लावला. 

मिळलेल्या माहितीनुसार, मोबाईल लुडो गेम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भिगवण गावच्या १९ वर्षाच्या तरुणाची ओळख पंजाब राज्यात राहणाऱ्या तरुणीशी झाली. ओळखीतून एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होत त्याचे रुपांतर प्रेमात झाले.मग पुढं काय सुरु झालेल्या चॅटिंगमध्ये या दोन प्रेमी युगुलाने एकत्र येण्याचे ठरविले. प्रेमिका पंजाबपासून निम्मे अंतर पार करून आली तर प्रियकराने निम्मे अंतर पार करत प्रेमिकेला आपल्या घरी घेवून आला. प्रेमिकेच्या घरच्यांनी शोध घेत पंजाबपासून भिगवणला धडक मारली.

भिगवण येथे आलेल्या पंजाबच्या नातेवाईकांनी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रेमी युगुलाला त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.यावेळी पोलीस ठाण्यातील वातावरण एकदम तंग झाल्याचे दिसून आले.मुलीच्या बाजूने आलेली माणसे धड धाकट असल्यामुळे आणि यातून काही वादाचा प्रसंग येवू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे काम केले. 

मुलीच्या वडिलांनी अनेक प्रयत्न करूनही मुलगी आपल्या प्रियकरासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. आता मुलगी २१ वर्षाची असल्यामुळे कायद्यानुसार तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर मुलगा १९ वर्षाचा असला तरी त्याने तिच्याशी लग्न केले नसल्यामुळे कोणतीच कारवाई पोलिसांना करणे शक्य नव्हते. मग काय भिगवण पोलीस या प्रेमी युगुलाच्या बाजूने उभे राहत मुलीच्या नातेवाईकांना समजूत घालत परत पाठविण्यास यशस्वी झाले.त्यामुळे अखेर पंजाबची प्रेयसी आणि भिगवणचा प्रियकर लिव्ह इन रिलेशन मध्ये घरी राहण्यासाठी गेले.

प्रचलित कायद्यानुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. तर १९ वर्षाच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते 'लिव्ह इन रिलेशन' मध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही. त्यामुळे यात कारवाई काय करावी हे भिगवण पोलिसांनाही समजेनासे असल्याचे दिसून आले.

टॅग्स :BhigwanभिगवणLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टrelationshipरिलेशनशिपIndapurइंदापूरPoliceपोलिसPunjabपंजाब