अपंगासाठी युनिक कार्डची निर्मिती करणार : राजुरकर
By Admin | Updated: June 10, 2014 22:54 IST2014-06-10T22:41:00+5:302014-06-10T22:54:13+5:30
अपंगांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ विनाअट मिळण्याकरिता युनिक कार्डाची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली.

अपंगासाठी युनिक कार्डची निर्मिती करणार : राजुरकर
पुणे : अपंगांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ विनाअट मिळण्याकरिता युनिक कार्डाची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने आयोजित अपंगाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे पिम महाराष्ट्र अध्यक्ष धमेंद्र सातव उपस्थित होते.
राजुरकर म्हणाले, समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विदयार्थ्यांना दिल्या जाणा-या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या तुलनेत अपंग विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती अतिशय तुटपुंजी असून ती वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
धमेंद्र सातव म्हणाले, अपंगाना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी एकच कार्ड असले पाहिजे तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी अपंगांना मुक्त संचार करता येण्यासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमोद भानगिरे, नंदकुमार फुले, राजेंद्र मोरे, सुरेखा ढवळे, दिलीप जाधव, अमित थोरात, संदीप शिर्के, दिलीप मोडक, अतुल शिंदे, सुहास गोलांडे, अभय पवार, हरिदास शिंदे, माऊली वाघमारे, रोहित भोसले, राजु वाघमारे, संतोष गायकवाड उपस्थित होते.