पुणे - राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र कारवाई न झाल्याने स्वतः केंद्रीय मंत्री यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.सरकारला विरोधकांचा घेरावही घटना उघड होताच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवरच असे प्रकार घडत असतील, तर सामान्य मुलींचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेने कायद्याचा धाक कमी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.एकनाथ खडसेंचा संताप: “पोलीस असतानाही गुंडांचा धाक”!या घटनेवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या गुंडांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. यात्रेत उपस्थित असलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मग महिलांची सुरक्षा कशी राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रूपाली चाकणकर यांचा इशारा: “टवाळखोरांना जनतेसमोर आणू!”या घटनेवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, “या प्रकरणाकडे मी स्वतः लक्ष देत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.”चाकणकर पुढे म्हणाल्या, “ही विकृती समाजातून नष्ट झाली पाहिजे. या गुन्हेगारांचे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत. केवळ काळे कपडे घालून निषेध करण्यापेक्षा, त्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.” यावेळी बोलताना त्यांनी, पोलीस तपासात मीडिया ट्रायल होऊ नये, पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन केले.महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरया घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, सरकार व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत छेडछाड झाल्याने सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.