शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 07:00 IST

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले...

ठळक मुद्देसमानतनेचे वातावरण तयार व्हायला हवे

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नारी ते नारायणी चा नारा देत महिला सक्षमीकरणाची ग्वाही दिली. मात्र, केवळ पैशांची तरतूद आणि घोषणांचा पाऊस यामुळे सबलीकरण होणार का, असा सवाल विविध क्षेत्रातील महिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.महिला सक्षम असेल तर देश सक्षम होईल, अशी शिकवण स्वामी विवेकानंदांनी दिली. त्याचा दाखला देत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले. जनधन योजनेत खाते असलेल्या महिलेला पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल आणि बचतगटांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ म्हणाल्या, विकासासाठी पैसा आवश्यक आहेच; मात्र, केवळ पैशांची तरतूद करुन सक्षमीकरण होणार नाही. महिलांमध्ये जाणीव-जागृती आवश्यक आहे की नाही, हे महत्वाचे आहे. महिला वैचारिकदृष्टया समर्थ व्हाव्यात, यासाठी कार्यक्रम घ्यायला हवेत. महिला विचार करु लागल्या तर योग्य निर्णय घेण्यास त्या उद्युक्त होतील.ह्णज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, ह्यअसंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. केवळ कर्ज देऊन महिलांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. पैसे देऊन सबलीकरण कसे होईल? शेरोशायरी जास्त आणि ठोस आकडेवारी कमी अशी अर्थसंकल्पाची स्थिती आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे.------------महिलांची कामाच्या ठिकाणची संख्या आजही कमी आहे. बचतगटांना पुढे आणणे, आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र, बचतगटांमधून कर्ज घेऊन महिला ते पैसे कुठे वापरतात, हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. केवळ कर्ज मिळते म्हणून ते पैसे स्वत:साठी वापरले न गेल्यास काय उपयोग? महिला निर्णय प्रक्रियेत महत्वाच्या ठरतात का, हा कळीचा मुद्दा आहे. समानतेची भाषा करताना त्यासाठी पूरक वातावरण निर्माण होणेही गरजेचे आहे. कायद्यांना बळकटी देऊन त्यांची अंमलबजावणीची तरतूद अर्थसंकल्पात असायला हवी. असंघटित कामगारांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तळमळीने काम केले पाहिजे. अन्यथा धोरणे केवळ कागदावरच मर्यादित राहतील.- अ‍ॅड. रमा सरोदे

टॅग्स :PuneपुणेUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनWomenमहिला