शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वैचारिकतेला धक्का न लावता कलाकृती समजून घ्यावी : उमा कुलकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:35 PM

तिसरे विचार भारती साहित्य संमेलन 

अनुवाद शैली वेगळी असते का? प्रत्येक लेखकाची वेगळी शैली असते. ती कलाकृतीतून घ्यावी लागते. अनुवादकाने बेधडकपणे अनुवाद करायला सुरुवात केली पाहिजे. लेखकाची कलाकृती तुम्ही अनुवाद करत असलेल्या लेखनाची आवश्यक ती शैली बनवून घेते. त्यानंतर अनुवाद करण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हाला अनुवाद करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य असते; परंतु एकदा अनुवाद करण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर उत्तम अनुवाद करणे, ही तुमची जबाबदारी आहे. कन्नड लोकांच्या मराठी साहित्याबद्दल काय कल्पना आहेत?कन्नड लोकांना मराठी साहित्याबद्दल विचारले तर ते सांगतात की, आम्ही गळकनाथ वाचत मोठे झालो. गळकनाथ हे मराठीतील साहित्य कन्नडमध्ये घेऊन जाणारे मोठे साहित्यिक होते. त्यांनी ऐतिहासिक कादंबºयांचा कन्नड अनुवाद केला. त्यांना मराठी लेखकाची नावे माहीत नाहीत; परंतु कर्नाटकातील विचारवंत आणि लेखकांनी मराठीतील वैचारिक साहित्य वाचले आहे. काही विद्वान लोकांनी रा. चिं. ढेरे यांची पुस्तके वाचली आहेत. दाक्षिणात्य भाषा उत्तरेकडे चालत नाही. उत्तरेकडील लोक दाक्षिणात्य स्वीकारत नाहीत. हा विरोध कमी करण्यासाठी साहित्य उपयोगी पडेल का?माणसाचे भावजीवन हे ललित साहित्यातून कळते. वैचारिक साहित्य डोक्यात शिरते. त्यानंतर हृदयापर्यंत पोहोचते. ललित साहित्य हृदयाला स्पर्श करते. ललित कलामुळे देवाण घेवाण याचे प्रमाण वाढते. मग भाषांमधील सामंजस्यपणा सुधारतो.भारतीय प्रांतातील लेखकांची ओळख एकमेकांना प्रांताने करून दिली आहे का?विरुपाक्ष यांनी मराठी पुस्तके कन्नड भाषेत अनुवादित केली. वाचकांची भूक वाढत चालली आहे. त्याला स्वभाषेव्यतिरिक्त इतर साहित्य जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे अनुवादकही निरनिराळ्या भाषेत अनुवाद करत आहेत. चंद्रकांत पोकळे यांच्यासारख्या अनुवादकाने १०० पेक्षा जास्त पुस्तके अनुवादित केली आहेत. मराठी भाषेतून इतर भाषेत अनुवाद करणाºया लोकांचा सत्कार केला, तर ते अतिउत्साहाने काम करतील.  अनुवाद करताना अनुवादकाने कोणती काळजी घ्यावी? शब्दार्थ चालतील, पण शब्द नको यावर तुमचे मत काय? लेखकाची संपूर्ण कलाकृती काय सांगू पाहते, याचा वेध घ्यावा. काहींची कलाकृती शब्दप्रधान, तर काहींची भावनेला महत्त्व देणारी असू शकते. मी त्यांच्या वैचारिकतेला कधीही तडजोड केली नाही. अनुवाद करताना त्यांच्या भावनेचा, भाषेचा जास्त विचार केला. 

......

साहित्यात सोशल मीडियामुळे काय बदल जाणवत आहे?नवीन पिढीला आपले लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. तरुण मंडळी पोस्टला लाइक मिळाल्याने आनंदी होतात; परंतु आपण एखादे पुस्तक तयार केले, की ते घेऊन प्रकाशकाकडे जातो. प्रकाशकाला पुस्तक आवडले तरच त्याचे प्रकाशन होते. नाहीतर आपल्याला पुन्हा पाठवले जाते. त्या साहित्यावर पुन्हा कष्ट घेतले जातात. म्हणूनच जुनी पुस्तके अजूनही वाचली जातात. त्यांचे अनुवाद होतात. पुढील काळात नवीन मुलांना जुन्या लेखकांच्या भेटीही होणार नाहीत. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य