Understanding of artwork without pushing ideology: Uma Kulkarni | वैचारिकतेला धक्का न लावता कलाकृती समजून घ्यावी : उमा कुलकर्णी 
वैचारिकतेला धक्का न लावता कलाकृती समजून घ्यावी : उमा कुलकर्णी 

अनुवाद शैली वेगळी असते का? 
प्रत्येक लेखकाची वेगळी शैली असते. ती कलाकृतीतून घ्यावी लागते. अनुवादकाने बेधडकपणे अनुवाद करायला सुरुवात केली पाहिजे. लेखकाची कलाकृती तुम्ही अनुवाद करत असलेल्या लेखनाची आवश्यक ती शैली बनवून घेते. त्यानंतर अनुवाद करण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हाला अनुवाद करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य असते; परंतु एकदा अनुवाद करण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर उत्तम अनुवाद करणे, ही तुमची जबाबदारी आहे. 
कन्नड लोकांच्या मराठी साहित्याबद्दल काय कल्पना आहेत?
कन्नड लोकांना मराठी साहित्याबद्दल विचारले तर ते सांगतात की, आम्ही गळकनाथ वाचत मोठे झालो. गळकनाथ हे मराठीतील साहित्य कन्नडमध्ये घेऊन जाणारे मोठे साहित्यिक होते. त्यांनी ऐतिहासिक कादंबºयांचा कन्नड अनुवाद केला. 
त्यांना मराठी लेखकाची नावे माहीत नाहीत; परंतु कर्नाटकातील विचारवंत आणि लेखकांनी मराठीतील वैचारिक साहित्य वाचले आहे. काही विद्वान लोकांनी रा. चिं. ढेरे यांची पुस्तके वाचली आहेत. 
दाक्षिणात्य भाषा उत्तरेकडे चालत नाही. उत्तरेकडील लोक दाक्षिणात्य स्वीकारत नाहीत. हा विरोध कमी करण्यासाठी साहित्य उपयोगी पडेल का?
माणसाचे भावजीवन हे ललित साहित्यातून कळते. वैचारिक साहित्य डोक्यात शिरते. त्यानंतर हृदयापर्यंत पोहोचते. ललित साहित्य हृदयाला स्पर्श करते. ललित कलामुळे देवाण घेवाण याचे प्रमाण वाढते. मग भाषांमधील सामंजस्यपणा सुधारतो.
भारतीय प्रांतातील लेखकांची ओळख एकमेकांना प्रांताने करून दिली आहे का?
विरुपाक्ष यांनी मराठी पुस्तके कन्नड भाषेत अनुवादित केली. वाचकांची भूक वाढत चालली आहे. त्याला स्वभाषेव्यतिरिक्त इतर साहित्य जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे अनुवादकही निरनिराळ्या भाषेत अनुवाद करत आहेत. चंद्रकांत पोकळे यांच्यासारख्या अनुवादकाने १०० पेक्षा जास्त पुस्तके अनुवादित केली आहेत. मराठी भाषेतून इतर भाषेत अनुवाद करणाºया लोकांचा सत्कार केला, तर ते अतिउत्साहाने काम करतील.  
अनुवाद करताना अनुवादकाने कोणती काळजी घ्यावी? शब्दार्थ चालतील, पण शब्द नको यावर तुमचे मत काय? 
लेखकाची संपूर्ण कलाकृती काय सांगू पाहते, याचा वेध घ्यावा. काहींची कलाकृती शब्दप्रधान, तर काहींची भावनेला महत्त्व देणारी असू शकते. मी त्यांच्या वैचारिकतेला कधीही तडजोड केली नाही. अनुवाद करताना त्यांच्या भावनेचा, भाषेचा जास्त विचार केला. 

......

साहित्यात सोशल मीडियामुळे काय बदल जाणवत आहे?
नवीन पिढीला आपले लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. तरुण मंडळी पोस्टला लाइक मिळाल्याने आनंदी होतात; परंतु आपण एखादे पुस्तक तयार केले, की ते घेऊन प्रकाशकाकडे जातो. प्रकाशकाला पुस्तक आवडले तरच त्याचे प्रकाशन होते. नाहीतर आपल्याला पुन्हा पाठवले जाते. त्या साहित्यावर पुन्हा कष्ट घेतले जातात. म्हणूनच जुनी पुस्तके अजूनही वाचली जातात. त्यांचे अनुवाद होतात. पुढील काळात नवीन मुलांना जुन्या लेखकांच्या भेटीही होणार नाहीत. 

Web Title: Understanding of artwork without pushing ideology: Uma Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.