शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन प्रणाली समजून घ्यावी : समीर शास्त्री; मराठी विज्ञान परिषदतर्फे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:01 IST

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमाला.

ठळक मुद्दे‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमालाबायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर वषार्नुवर्षे चालतात सुरळीत : शास्त्री

पुणे : ‘निसर्ग संवर्धनावर लक्ष केंद्रित करुन पुढच्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. निरोगी व स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करायला हवे. कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प दीर्घकाळ टिकत नाहीत. बायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर ते वषार्नुवर्षे सुरळीतपणे चालतात. यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची शाश्वत प्रणाली समजून घ्यायला हवी’, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. समीर शास्त्री यांनी केले. मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत डॉ. समीर शास्त्री ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी परिषदेचे सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, विज्ञानशोधिकेच्या सहसंचालिका भारती बक्षी उपस्थित होते.शास्त्री म्हणाले, ‘पुण्यातील नद्यांची परिस्थिती, उरुळी देवाची याठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग हे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, अनेक प्राणघातक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच निसर्ग समजायला, वाचायला शिकले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागतिक आणि स्थानिक पातळीवर विचार करून वैयक्तिक उपाय शोधायला हवेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन नीट व्हायला हवे.’संजय मालती कमलाकर यांनी प्रास्ताविक केले. मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या भारती बक्षी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सागर यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेSenapati Bapat Roadसेनापती बापट रोड