शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

२३ वर्षांखालील महिला क्रिकेट : महाराष्ट्राकडून हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 2:08 AM

यष्टिरक्षक फलंदाज शिवाली शिंदेचे शानदार अर्धशतक तसेच कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी केलेल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिके ट लीगमध्ये महाराष्ट्राने मंगळवारी हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा उडविला.

पुणे  - यष्टिरक्षक फलंदाज शिवाली शिंदेचे शानदार अर्धशतक तसेच कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी केलेल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिके ट लीगमध्ये महाराष्ट्राने मंगळवारी हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा उडविला. या स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.बीसीसीआयतर्फे आयोजित या स्पर्धेतील ही लढत नागपूर (जामठा) येथील व्हीसीए क्रिकेट स्टेडियमवर झाली. महाराष्ट्राच्या फलंदाज, गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षकांनी प्रभावी कामगिरी करीत हैदराबाद संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. शिवालीच्या ५२, तेजलच्यानाबाद ४७ तसेच देविकाच्या ३६ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २१९ धावा केल्या. सलामीवीर चार्मी गवई हिने ३१ तर सायली लोणकर हिने २४ धावांचे उपयोगी योगदान दिले. प्रत्युत्तरात, देविका (१७ धावांत ४ बळी) आणि तेजल (३४ धावांत ३ बळी) या जोडीने हैदराबादला ४९ षटकांत १५८ धावांवर गुंडाळले. महाराष्ट्राच्या क्षेत्ररकांनी लक्षणीय कामगिरी करताना हैदराबादच्या तिघींना धावबाद केले. या विजयासह महाराष्ट्राने ४ गुणांची कमाई केली.प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राचा प्रारंभ वाईट झाला. सलामीवीर प्रियांका घोडके हिला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सलामीवीर चार्मी आणि शिवाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला सावरले. देविका-तेजल जोडीने चौथ्या विकेटसाठी ३७ तर, तेजल-सायली जोडीने पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केल्याने महाराष्ट्राला दोनशेपार धावसंख्या उभारता आली. हैदराबादतर्फे कीर्ती रेड्डीने सर्वाधिक ४ बळी घेतले.विजयासाठी २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने २ फलंदाज २६ धावांत गमावले. सलामीवीर जी. त्रिशा (४७) आणि कीर्ती रेड्डी (२८) यांनी तिसºया विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी २०.२ षटके खर्ची घातली. तेजलने एकाच षटकात या दोघींना बाद करीत हैदराबादवरील दबाव वाढविला. त्यानंतर लक्ष्मी प्रसन्नाचा (नाबाद ३२) अपवाद वगळता प्रतिस्पर्धी संघाची एकही फलंदाज मैदानावर टिकू शकली नाही. या संघाच्या ४ फलंदाज शून्यावर बाद झाल्या.संक्षिप्त धावफलक :महाराष्ट्र : ५० षटकांत ७ बाद २१९ (शिवाली शिंदे ५९, तेजल हसबनीस नाबाद ४७, देविका वैद्य ३६, चार्मी गवई ३१, सायली लोणकर २४, कीर्ती रेड्डी ४/३८, सी. श्रावणी भोगी १/१३, ई. चित्रा माहेश्वरी १/२१) वि. वि. हैदराबाद : ४९ षटकांत सर्व बाद १५८ (जी. त्रिशा ४७, लक्ष्मी प्रसन्ना नाबाद ३२, कीर्ती रेड्डी २८, देविका वैद्य ४/१७, तेजल हसबनीस ३/३४).

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र