शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हगवणे बंधूंना शस्त्र मिळवून देण्यासाठी मामांचा हात; अखेर जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:51 IST

शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे

पुणे: कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुपेकर यांची अखेर मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बदली करताना सुपेकर यांचे हे पद अवनत करण्यात आले आहे. त्यामुळे सुपेकर यांच्यावर मोठी नामुष्की ओढविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला, असा आरोप करण्यात येत होता. त्यात जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हगवणे कुटुंबीय आपले दूरचे नातेवाईक असून या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा सुपेकर यांनी तातडीने केला होता. मात्र, या संदर्भात राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागल्याने गृह विभागाने गुरुवारी सुपेकर यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर व नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यानंतर शशांक हगवणे याने शस्त्र परवाना देताना बनावट रहिवासाचे पुरावे दिल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा शस्त्र परवाना देताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त म्हणून जालिंदर सुपेकर कार्यरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शस्त्र परवाना देण्यात सुपेकर यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या काही मिनिटांतच सुपेकर यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश गृह विभागाने काढले. सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. हे पद अवनत करून सुपेकर यांना देण्यात आले आहे. आता या प्रकरणात सुपेकर यांच्यावर आणखी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकCourtन्यायालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड