शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता; महोत्सव पुढे ढकलला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 12:13 IST

यंदा कोरोनाच्या संकटामुळे महोत्सव करायचा किंवा नाही या द्विधा परिस्थितीत आयोजक अडकले आहेत.

ठळक मुद्दे यंदा महोत्सव होणार का? की ऑनलाइन महोत्सवाचे आयोजन केले जाणार? अशी विचारणा

पुणे : डिसेंबर महिना उजाडला की ’कानसेनां’ना वेध लागतात ते देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे. भारतीय अभिजात संगीत विश्वात या महोत्सवाने एक मानदंड प्रस्थापित केला आहे. यंदा महोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली आहे. परंतु दरवर्षी महोत्सवाला येणाऱ्या दर्दी रसिकांची संख्या पाहता यंदाच्या वर्षी महोत्सवाच्या आयोजनाबाबत एकप्रकारची अनिश्चितता आहे. 

सरकारने मोठे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची आयोजक वाट बघत आहेत. ती न मिळाल्यास यंदाचा महोत्सव पुढे ढकलण्याचे संकेत आयोजकांकडून देण्यात आले आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने  ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सव आयोजित केला जातो. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे सुरेल अविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळते. त्यामुळे या महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहात असतात. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे महोत्सवाबाबत रसिकांच्या महोत्सवाविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा महोत्सव होणार का? की ऑनलाइन महोत्सवाचे आयोजन केले जाणार? अशी विचारणा रसिकांकडून केली जात आहे. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे महोत्सव करायचा किंवा नाही या द्विधा परिस्थितीत आयोजक अडकले आहेत. महोत्सवाबाबत अद्याप तरी आयोजकांनी ठोस कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. याविषयी  ‘लोकमत’ने आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता व्यक्त केली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला देशविदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानसेन हजेरी लावतात. स्वरमंडपात बसून कलाकारांना ऐकणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते.  ऑनलाइन महोत्सवात हा अनुभव  मिळणे शक्य नाही. त्यामुळे हा महोत्सव आँनलाइन आयोजित करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. ----------------------------------------------- ’कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठे कार्यक्रम करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. सरकारने परवानगी दिल्यानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव करायचा की नाही यावर आम्ही विचार करू- श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ -------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतBhimsen Joshiभीमसेन जोशी