शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये ‘सोनोग्राफी’चा विनापरवाना वापर

By admin | Updated: March 28, 2015 01:00 IST

राज्य शासनाचे रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये ६ वर्षांपासून विनापरवाना सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : राज्य शासनाचे रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये ६ वर्षांपासून विनापरवाना सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या पीसीपीएनडीटी सेलने ससूनची तपासणी करून मशिन सील केली असून, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एकीकडे राज्यात स्त्रीभ्रूणहत्येची प्रकरणे समोर येत असताना शासकीय रुग्णालयातच विनापरवाना सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत असल्याने शासनच स्त्रीभ्रूणहत्येप्रकरणी संवेदनशील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.ससूनच्या नेत्रविकार विभागात रुग्णांच्या डोळे तपासणीसाठी ‘ए स्कॅन’ ही सोनोग्राफी मशिन वापरली जाती होती. सन २००९पासून ही सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत होती. नवे सोनोग्राफी मशिन घेतल्यानंतर त्याची नोंदणी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असतानाही ससूनमध्ये २००९ पासून ही मशिन विनापरवाना वापरण्यात येत होती. याबाबतची माहिती पालिकेच्या पीसीपीएनडीटी सेलला समजल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी २३ मार्चला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ससूनमध्ये तपासणी केली. रात्री सव्वाबाराच्या सुमारास संबंधित सोनोग्राफी मशिन सील करण्यात आली. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट) आणण्यात आला. मात्र, त्यानंतरही खासगी स्तरावर छुप्या पद्धतीने गर्भलिंगनिदान केले जात असल्याचे समोर येत आहे. पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयात विनापरवाना सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.खासगी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीनचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानंतरच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा करण्यात आला आहे. तरीही हा प्रकार समोर आला आहे.पालिकेकडे सोनोग्राफी मशिनची नोंदणी बंधनकारक आहे. ससून रुग्णालयात विनापरवाना सोनोग्राफी मशिन वापरण्यात येत असल्याची माहिती आमच्या पीसीपीएनडीटी सेलला कळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासणी करून कारवाई केली आणि मशिन सील केली आहे. त्यासंदर्भात त्यांना नोटिसही पाठविण्यात आली आहे.- कुणाल कुमार,आयुक्त, पुणे महापालिकाससून रुग्णालयाच्या नेत्रविकार विभागात ‘ए स्कॅन’ नावाची मशिन रुग्णांचे डोळे तपासणी करण्यासाठी वापरली जात होती. त्यातून केवळ स्कॅन केले जात होते. ती मशिन सोनोग्राफी असल्याचे माहिती नव्हते. त्यामुळे आम्ही त्याची नोंदणी केली नाही. परंतु त्याची माहिती कळताच आम्हीच पुणे महापालिकेशी संपर्क साधून याची माहिती दिली.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय