शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अारक्षणावरुन धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 16:27 IST

अारक्षणाच्या मुद्यावरुन अाता धनगर समाजही अाक्रमक झाला असून या समाजाकडून सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात अाला अाहे.

पुणे :  राज्यात मराठा समाजाच्या अारक्षणासाठीचे अांदाेलन तीव्र हाेत असताना अाता धनगर समाजाने सुद्धा अारक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम दिले अाहे. सरकारने जाहीर केलेले 93 हजार धनगडांमधील एकतरी 'धनगड' एका महिन्यात दाखवावा अन्यथा परिणामाला सामाेरे जावे असा इशारा 'धनगर' समाजाकडून देण्यात अाला अाहे. धनगर समजाच्या नेत्यांनी साेमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उत्तमराव जानकर, गाेपीचंद पडळकर उपस्थित हाेते. 

    राज्यातील दिड काेटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षांपासून घटनादत्त अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड अादिवासी जमात उभी करुन समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवले अाहे. 2014 साली धनगर समाजाने अारक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून भाजपाचे सरकार अाणले. परंतु मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न साेडविण्याएेवजी टाटा इन्स्टिट्यूट अाॅफ साेशल सायन्स (टिस्स) च्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालवली असल्याचा अाराेप उत्तम जानकर अाणि गाेपीचंद पडळकर यांनी यावेळी केला. जानकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, अादिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड अाढळून अाला नाही. दरम्यान, धनगर समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बाेगस अादिवासी दाखविले अाहेत. यावर अादिवासी समाजाने त्यांच्या लाेकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 अामदार, तर 30 ट्क्के अनुदान अाणि 30 टक्के नाेकऱ्या या इतर समाजाच्या बाेगसगिरी करुन हडपल्या अाहेत.

    धनगर शब्दामध्ये 'र' चा 'ड' झालेला असून ताे देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत अाहे. दरम्यान 1 अाॅगस्ट राेजी 1 लाखाच्या संख्येने धनगर समाज पुण्यातील दुधाणे लाॅन्स, कर्वेनगर येथे जमा हाेणार अाहे. यावेळी धनगर अारक्षणाच्या धगधगत्या स्फुर्ती गीताच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन करण्यात येणार अाहे.  सरकारने एका महिन्याच्या अात  93 हजार धनगडांमधील एकतरी धनगड दाखवला नाही तर हाेणाऱ्या परिणामांना सरकारला सामाेरे जावे लागेल असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात अाला अाहे.

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्री