शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

विद्यापीठांना मिळणार अखेर पूर्णवेळ अधिष्ठाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:47 AM

राज्य शासनाकडून मंजुरी : अडीच वर्षांपासून रखडल्या होत्या नियुक्त्या

पुणे : राज्य शासनाने अखेर नवीन विद्यापीठ कायदा लागू होऊन अडीच वर्षे उलटल्यानंतर पूर्णवेळ अधिष्ठाते भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रभारींवर कामाचा गाडा हाकत असलेल्या विद्यापीठांना अखेर पूर्णवेळ ४ अधिष्ठाते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अधिष्ठात्यांच्या वेतनाचा भार कुणी उचलायचा यावरून अधिष्ठात्यांच्या नेमणुका रखडल्या होत्या. त्यामुळे या नियुक्त्याच होऊ शकत नव्हत्या. अखेर शासनाकडून या अधिष्ठात्यांचे वेतन करण्यास मंजुरी मिळाल्याने त्यांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यास मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने १ मार्च २०१६ पासून महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, या कायद्यातील तरतुदीनुसार ४ पूर्णवेळ अधिष्ठात्यांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्या होत्या. वस्तुत: प्रत्येक विद्याशाखानिहाय असलेली अधिष्ठात्याची पदे रद्द करून पूर्णवेळ ४ अधिष्ठातापदांची तरतूद कायद्यात केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्त्या न झाल्याने प्राध्यापकांकडेच अतिरिक्त पदभार दिला होता. मात्र, कामाच्या व्यापामुळे त्यांना याकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नव्हते. पदावर नियुक्त होणाऱ्या प्राध्यापकांना शासनाऐवजी विद्यापीठाच्या फंडातून वेतन दिले, तर त्या प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता ५ वर्षांसाठी खंडित होणार होती. त्यामुळे आपली सेवा खंडित करून या पदावर काम करण्यासाठी प्राध्यापक तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अखेर शासनाकडून या अधिष्ठात्यांचे वेतन दिले जाणार असल्याने याचा तिढा सुटला आहे.विद्यापीठांकडून निघणार जाहिरातीराज्य शासनाकडून विद्यापीठांमधील अधिष्ठात्यांची पदे भरण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आता विद्यापीठ स्तरावर ४ अधिष्ठाता पदांच्या नियुक्तीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागविले जातील. त्यानंतर रीतसर मुलाखती घेऊन नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ